गुन्हे विषयक
चासनळीत अवैध वाळूचोरी,चौघांवर कोपरगावात गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चासनळी ग्रामपंचायत हद्दीत गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करण्यास नगर जिल्ह्याधिकाऱ्यांची बंदी असतानाही आरोपी मालक गंगाधर मोहन दळवी (वय-३२),भाऊसाहेब माळी (पूर्ण नाव माहिती नाही),सुनील निवृत्ती साबळे (वय-३२),रा.मोर्विस,श्रीरंग चांदगुडे (पूर्ण नाव माहिती नाही) चासनळीत अवैध वाळूचोरी केली असल्याचे उघड झाल्याने फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल रणजित पोपट जाधव यांनी वरील चौघा आरोपीवर कोपरगावात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुका पोलीस अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त खबरीवरून तालुका पोलिसानी त्या ठिकाणी दि.२२ एप्रिल रोजी रात्री ७.५४ वाजेच्या सुमारास धाड टाकली असता त्या ठिकाणी आरोपी मालक गंगाधर मोहन दळवी (वय-३२),भाऊसाहेब माळी (पूर्ण नाव माहिती नाही),सुनील निवृत्ती साबळे (वय-३२),रा.मोर्विस,श्रीरंग चांदगुडे (पूर्ण नाव माहिती नाही) चासनळीत आपल्या फायद्याकरिता अवैध वाळू वाहतूक व चोरी करताना आढळून आले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यात वर्तमानात कोरोना साथीचे थैमान सुरु आहे.तालुका प्रशासन या साथीचा प्रतिबंध करण्यास प्रयत्नशील असताना वाळूचोरांनी आपली हाथ की सफाई दाखविण्यास प्रारंभ केला आहे.अशीच घटना नुकतीच चासनळी या ठिकाणी घडली आहे.कोपरगाव तालुका पोलीस अधिकाऱ्यांना गुप्त खबऱ्या मार्फत खबर मिळाली की,चासनळी शिवारात गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरु आहे.त्या खबरीवरून तालुका पोलिसानी त्या ठिकाणी दि.२२ एप्रिल रोजी रात्री ७.५४ वाजेच्या सुमारास धाड टाकली असता त्या ठिकाणी आरोपी मालक गंगाधर मोहन दळवी (वय-३२),भाऊसाहेब माळी (पूर्ण नाव माहिती नाही),सुनील निवृत्ती साबळे (वय-३२),रा.मोर्विस,श्रीरंग चांदगुडे (पूर्ण नाव माहिती नाही) चासनळीत आपल्या फायद्याकरिता अवैध वाळू वाहतूक व चोरी करताना आढळून आले आहे.दरम्यान त्यातील दोन आरोपी भाऊसाहेब माळी व श्रीरंग चांदगुडे हे फरार झाले आहे.घटनास्थळी पोलिसांना ०४ लाख १० हजार रूपये किमतीचा एक सिल्वर रंगाचा आयशर कंपनी ४८५ ट्रॅक्टर व त्यास जोडलेली डम्पिंग ट्रॉली त्यात १० हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू,तर एक लाल रंगाचा स्वराज्य कंपनीचा ७४४ मॉडेलचा ट्रॅक्टर डम्पिंग ट्रॉली जोडलेली असा ऐवज मिळून आला आहे.दरम्यान यात चांदगुडे हा शिवसेनेचा पदाधिकारी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव यांच्या फिर्यादीवरून १२०/२०२१ भा.द.वि कलम ३७९,३४ प्रमाणे पर्यावरण संतुलन कायदा कलम ३,१५,प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.प्रभाकर काशीद हे करीत आहेत.