गुन्हे विषयक
घास तुडवल्याच्या कारणावरून हाणामारी,कोपरगावात चौघांवर गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वारी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेले फिर्यादी हे आपल्या वाट्याच्या जमिनीत घास कपात असताना यातील आरोपी नागेश संजय पंडोरे,योगेश बाबासाहेब पंडोरे,बाबासाहेब फकिरा पंडोरे,संजय फकिरा पंडोरे सर्व रा.वारी यांनी घास तुडवला याचा फिर्यादीने जाब विचारल्याचा राग येऊन पहिल्या दोन आरोपीनी आपल्या डोक्यात काठीने मारून जखमी केले तर तिसऱ्या आरोपीने आपल्या मांडीला चावा घेऊन जखमी केले तर चौथ्या आरोपीने लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचा गुन्हा फिर्यादी माधव लालचंद पंडोरे (वय-३२) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने वारी परिसरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी हे दि.२२ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास आपल्या वाट्याच्या शेतात घास कापत असताना आरोपी नागेश संजय पंडोरे,योगेश बाबासाहेब पंडोरे,बाबासाहेब फकिरा पंडोरे,संजय फकिरा पंडोरे सर्व रा.वारी आदी चार जण घास तुडवताना दिसले याचा रीतसर जाब फिर्यादी माधव पंडोरे यांनी त्याबाबत त्यांना विचारणा केली व त्या बाबत जाब विचारला याचा राग येऊन आरोपी नागेश पंडोरे व योगेश पंडोरे यांनी फिर्यादीस काठीने डोक्यात मारहाण केली फिर्यादिस जखमी केले आहे.
सदरचे सविस्तर वृत असे की,”वारी ग्रामपंचायत हद्दीत फिर्यादी माधव पंडोरे यांनी शेत वाट्याने घेतलेले आहे.त्या शेतात त्यांनी आपल्या जनावरांना घास पिकवला आहे.त्या ठिकाणी फिर्यादी हे दि.२२ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास आपल्या वाट्याच्या शेतात घास कापत असताना आरोपी नागेश संजय पंडोरे,योगेश बाबासाहेब पंडोरे,बाबासाहेब फकिरा पंडोरे,संजय फकिरा पंडोरे सर्व रा.वारी आदी चार जण घास तुडवताना दिसले याचा रीतसर जाब फिर्यादी माधव पंडोरे यांनी त्याबाबत त्यांना विचारणा केली व त्या बाबत जाब विचारला याचा राग येऊन आरोपी नागेश पंडोरे व योगेश पंडोरे यांनी फिर्यादीस काठीने डोक्यात मारहाण केली फिर्यादिस जखमी केले व अन्य आरोपी बाबासाहेब पंडोरे याने फिर्यादीचे डाव्या पायाचे मांडीस चावा घेऊन द दुखापत केली.व चौथा आरोपी संजय पंडोरे याने लाथा बुक्यांनी मारहाण केली आहे.व उपस्थित साक्षिदार यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.याबाबत फिर्यादी माधव पंडोरे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.११९/२०२१ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५००४,३०६,३४ प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.