गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात दुकानाचे छत कापून चोरी,गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत हद्दीतील फिर्यादी अमोल पोपट माळी (वय-३८) यांच्या मालकीचे मोबाईलचे दुकानांचे छत कापून दुकानातील विविध मोबाईल व त्यासाठीचे आवश्यक अन्य साहित्य, व ७ हजारांची रोख रक्कम असा ३६ हजार ७०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यानी नुकताच अंधाराचा फायदा घेऊन व पाळत ठेऊन लंपास केला असल्याची खबर कोपरगाव तालुका पोलिसात दाखल झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
वर्तमानात कोरोनाचा कहर सुरु असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात बळी जात आहे.आता टाळेबंदीमुळे रुग्णसंख्या रोडावली असली तरी ती स्थिरस्थावर होण्यास अजून किमान दोन ते तीन पंधरवाड्याचा कालावधी लागेल असा अंदाज आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकांऱ्यानी जाहीर केलेली टाळेबंदी दुकानदार इमाने इतबारे पाळत असताना काही चोरट्यानी नेमका याच संधीचा फायदा उचलला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,वर्तमानात कोरोनाचा कहर सुरु असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात बळी जात आहे.आता टाळेबंदीमुळे रुग्णसंख्या रोडावली असली तरी ती स्थिरस्थावर होण्यास अजून किमान दोन ते तीन पंधरवाड्याचा कालावधी लागेल असा अंदाज आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकांऱ्यानी जाहीर केलेली टाळेबंदी दुकानदार इमाने इतबारे पाळत असताना काही चोरट्यानी नेमका याच संधीचा फायदा उचलला आहे.रात्रीच्या सुमारास कोरोनामुळे दुकानात कोणी व्यापारी झोपत नाही या संधीचा फायदा उचलून काही चोरटे पाळत ठेऊन दुकानावर डल्ला मारताना दिसत आहे. याचाच अनुभव धामोरी येथील मोबाईल दुकानदार अमोल माळी यांना आला असून ते दि.१७ एप्रिल रोजी आपले दुकान नेहमीप्रमाणे बंद करून आपल्या घरी गेले असता अज्ञात चोरट्यानी त्यांच्या दुकानावर पाळत ठेऊन रात्री आजूबाजूस कोणी नाही हि संधी साधत त्यांच्या दुकानांच्या छतांचे पत्रे उचकटून त्यातील माल ४ हजार ५०० रु.किमतीचे तीन ‘जिओ’ कंपनीचे छोटे मोबाईल प्रत्येकी १५०० रु.की.चे,४ हजार रु.चे चार मोबाइल ‘आयटेल’ कंपनी चे प्रत्येकी १ हजार रु.किं.चे,२ हजार ४०० रुपये किमतीचे दोन मोबाईल ‘सॅमसंग’ कंपनीचे प्रत्येकी ची १ हजार २०० रुपये किमतीचे,५ हजार ४०० रुपये किमतीचे ‘रियल मी’ कंपनीचे ब्लूटूथ प्रत्येकी किमंत २ हजार रुपये कि.चे,८ हजार रुपये किमतीचे १७ ब्लूटूथ प्रत्येकी ५०० रुपये कि.चे,४०० रुपये किमतीचे ‘सिटीझन’ कंपनीचे आठ हँड वॉच प्रत्येकी ३०० रुपये कि.चे,३ हजार रुपये किमतीचे ‘सेंड डिक्स’कंपनीचे दहा मेमरी कार्ड,जी.बी.चे प्रत्येकी की ३०० रुपये कि.चे,७ हजार रुपये रोख त्यामध्ये १००,५०,२०,१० रुपये किमतीच्या नोटा असा एकूण ३६ हजार ७०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने धामोरी परिसरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी फिर्यादी अमोल माळी यांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गु.र.क्रं.११६/२०२१भा.द.वि.कलम ४६१,३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.प्रभाकर काशीद हे करीत आहेत.या घटनेने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.