गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात किरकोळ कारणावरून,कुऱ्हाडीने मारहाण
जनशक्ती न्यूजसेवाकोपरगाव-(प्रतिनिधी)भांडणाची पहिली फिर्याद दिलेली असून ‘ती’ का दिली त्यामुळे आम्हाला त्रास झाला असल्याच्या कारणावरून यातील आरोपी सुरेगाव शिवारातील आरोपी करण विजू इंगळे,संदीप दीपक मुळेकर,दीपक माणिकलाल मुळेकर,सोहेल दीपक मुळेकर आदींनी फिर्यादि जीवन छगन वाघमोडे (वय-५८ वर्ष ) यांना कुऱ्हाडीने,काठीने,दांड्याने,गजाने डोक्यात,पाठीत,पोटावर मारून जखमी केले व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आज दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
सुरेगाव शिवारात फिर्यादी जीवन वाघमोडे व आरोपी करण इंगळे हे शेजारी-शेजारी राहतात.त्यांचा मागील काही दिवसापूर्वी किरकोळ कारणावरून वाद आहे.त्यामुळे त्या वादातून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.काल परत काही कारणावरून त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव शिवारात फिर्यादी जीवन वाघमोडे व आरोपी करण इंगळे हे शेजारी-शेजारी राहतात.त्यांचा मागील काही दिवसापूर्वी किरकोळ कारणावरून वाद आहे.त्यामुळे त्या वादातून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.काल परत काही कारणावरून त्यांच्यात वादाची ठिणगी पडली व त्यातुंन त्याच गावातील आरोपी आरोपी करण विजू इंगळे,संदीप दीपक मुळेकर,दीपक माणिकलाल मुळेकर,सोहेल दीपक मुळेकर आदींनी फिर्यादि जीवन छगन वाघमोडे (वय-५८ वर्ष ) यांना कुऱ्हाडीने,काठीने,दांड्याने,गजाने डोक्यात,पाठीत,पोटावर मारून जखमी केले व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी फिर्यादी जीवन वाघमोडे यांनी गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आरोपी विरुद्ध गु.र.क्रं.९१/२०२१ भा.द.वी.३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.भताने हे करीत आहेत.