जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अपघात नव्हे हा तर घातपात होता, नरबळीचा प्रकार उघड

जाहिरात-9423439946

मुंबईतला कुलाबा परिसरात एका तीन वर्षांच्या मुलीचा नरबळी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शनिवारी कुलाब्यातील इमारतील्या सातव्या मजल्यावरून पडलेल्या शनाया हाथीरामाणी या तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू हा अपघात नव्हे तर घातपात होता असं तपासात स्पष्ट झाले आहे.या प्रकरणात आरोपी अनिल जुगाणी यानं नरबळीच्या उद्देशानं शनायाची हत्या केल्याचं स्पष्ट झालंय. आरोपी अनिल चुगाणी हा मोरक्कोत वास्तव्याला होता. सहा महिन्यापूर्वीच तो भारतात परतला होता. मोरक्कोत जुबेदा नावाच्या महिलेनं त्याच्यावर जादुटोणा केला होता. या जादुटोण्यातून बाहेर यायचं असेल तर दोन जुळ्या मुलांचा नरबळी द्यावा लागेल असं अनिलला सांगितलं गेलं होतं. अनिल मुंबईत आल्यानंतर सातत्यानं त्याच्या डायरीत दोन जुळ्यांची हत्या कर, जेलमध्ये जा आणि स्वतःला वाचव असं लिहीत होता.त्यानुसार त्यानं मित्राच्याच जुळ्या मुलींची हत्या करण्याचा निर्णय घेतला. अनिलनं शनिवारी शनाया आणि तिच्या जुळ्या भावाला घरी नेलं. शनायाला खोलीतून इमारतीखाली फेकलं. मात्र शनायाची आया आल्यानं तिचा भाऊ वाचला. पोलिसांनी अनिलला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती समोर आली
आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close