गुन्हे विषयक
पोहेगावातील “त्या”प्रमुख आरोपीला पळून जाताना केली अटक !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील एक आजी-माजी ग्रामपंचायत पदाधिकारी,अन्य दोन आप्तेष्ट व फिर्यादी नानासाहेब औताडे यांच्यात झालेल्या शेतातून जाण्याच्या वादातून झालेल्या संघर्षात एका माजी पदाधिकारीं स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन त्याला पच्छाताप झाल्यावर त्याने त्याच्या वकिलाच्या सल्ल्याने भ्रमणध्वनीवर बोलण्याचे नाटक करत तेथून पळ काढल्यावर शिर्डी पोलिसानी स्मशानभूमीजवळ पळताना अटक करून त्याच्या मुसक्या आवळल्या असल्याची धक्कादायक माहिती हाती आली असून त्यात ‘तो’ व एक महिला पोलीस या झटापटीत किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.त्यामुळे या घटनेची सर्वदूर चर्चा होताना दिसत आहे.
दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला असून सूचक मौन पाळले आहे.तर मात्र काही पोलीस कर्मचाऱ्यांनी नाव सांगण्याच्या अटीवर माहिती दिली आहे तर फिर्यादी यांनी या घटनेस दुजोरा दिला आहे.दरम्यान यात आरोपीला जेरबंद करण्यास सत्ताधारी राजकीय शक्तींनी आपली शक्ती पणाला लावली असल्याची महिती हाती आली आहे.त्यामुळेच आरोपीना अटक करणे पोलिसांना सोपे गेले असल्याची माहिती आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,”पोहेगाव येथील नानासाहेब औताडे यांच्या घरी वास्तूशांतीच्या कार्यक्रमाच्या दिवशी नानासाहेब औताडे यांचा भाऊ किरण औताडे शेतातून कोथींबीर आणण्यासाठी गेले असता त्याच्या शेजारी असलेल्या पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्थेच्या शेतातून जात असतांना मुख्य आरोपी नितीन औताडे याचा मुलगा ऋतिक औताडे याने आमच्या शेतातून जायचे नाही यावरून ऋतिक औताडे व किरण औताडे यांच्यात बाचाबाची झाली.त्याबाबत ऋतिक औताडे याने आपले वडील नितीन औताडे यांना याबाबत माहिती दिली.दुसऱ्या दिवशी नितीन औताडे यांनी नानासाहेब औताडे यांना त्यांच्या सर्व कुटुंबियांना घेवून त्यांच्या मालकीच्या कोपरगाव-संगमनेर रोडवर असलेल्या पेट्रोल पंपावर बोलाविले.त्यावेळी नानासाहेब औताडे यांनी आम्ही पेट्रोल पंपावर येणार नाही रस्त्यावर येवू असे सांगून नानासाहेब औताडे त्यांच्या सर्व कुटुंबियांना घेवून रस्त्यावर गेले असता नितीन भानुदास औताडे,त्याचा मुलगा ऋतिक औताडे,याचा भाऊ तुषार औताडे यांच्यासह पोहेगावचे विद्यमान सरपंच अमोल औताडे यांनी फायटर पंच,काठ्या,कुऱ्हाडी आदी धारदार शस्त्रांचा वापर करून नानासाहेब औताडे यांच्या कुटुंबियांना रक्तबंबाळ केले होते.त्याबाबत नानासाहेब औताडे हे शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यासाठी गेले असता पोलीस प्रशासनाकडून त्यांची फिर्याद नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली होती.मात्र फिर्याद दाखल करून घेतली नाही तर आपण शिर्डी पोलीस स्टेशनसमोर उपोषणाला बसू असा ईशारा नानासाहेब औताडे यांनी देताच त्यांची फिर्याद दाखल करून घेण्यात आली होती.त्या नंतर आरोपींना पाचारण केले असता स्वतः प्रमुख आरोपी औताडे हजर झाला मात्र पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दखल घेतल्याचे व आपल्याला अटक होणार हि बाब लक्षात आल्यावर मात्र त्याची बोबडी वळली.त्याने आपल्या विधी सहाय्यकास दूरध्वनी केला असता त्यांनी त्यास तुम्ही स्वतःहुन पोलीस ठाण्यात कशाला गेले ? असा सवाल केल्यावर यांना वस्तुस्थितीचे भान आले व त्याने,”आता चूक झाली पण यातून आता कसे बाहेर यायचे हे सांग”असे दरडावल्याच्या सुरात सल्ला विचारला त्या वेळी वकिलाने त्यास,”आता भ्रमणध्वनीवर बोलण्याचे नाटक करत तसेच बाहेर निघून या” असा सल्ला दिला त्या प्रमाणे या महाशयांनी प्रयत्न केला असता त्याच्याकडे बारीक लक्ष ठेऊन असलेल्या पोलिसांनीं या महाशयांना नगर-मनमाड रस्त्यापर्यंत येऊ दिले व यांनी पायीच नगर-मनमाड रस्त्याने रुई शिवरस्त्याकडे धूम ठोकली असता पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केला.त्यातून हे आरोपी महाशय पुढे जोराने पळत होते तर मागून दोन गृह खात्याचे जवान व दोन महिला पोलीस असा लवाजमा पाठलाग करत पळत होता.हा पाठशिवणीचा खेळ नजीकच्या गावातील नागरिक व साईभक्त विस्मयचकित होऊन पाहत होते.दरम्यान या महाशयांचे वय आणि तरुण पोलीसांचे वय यात या प्रमुख आरोपीची तफावत होणे स्वाभाविक होते.त्यातून त्यास स्मशान भूमीच्या पश्चिम बाजूस असलेल्या हॉटेल समोरच हा खेळ सुरु असताना तरुण पोलिसांचा वेगाने त्यावर मात केलेली आढळून आली असल्याचे दिसून आले आहे.व त्यांनी त्यास पकडण्याच्या नादात हे महाशय झटापटीत सदर रस्त्यावर दणकन आपटले असता त्यावर पोलिसानी झडप घातली होती त्यात एक महिला पोलिसही पडल्या असून त्या किरकोळ जखमी झाल्याची खात्रीशीर बातमी आहे.या महाशयांना पकडून आणल्यावर अखेर पोलीस अधिकाऱ्यासमोर हजर केले असता यांची पुन्हा शेंडी ताट होऊन यांनी पुन्हा खुर्चीवर बसून पोलीस कर्मचाऱ्यावर डाफरण्यास सुरुवात केली असता तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी पुन्हा यांची लायकी दाखवून देण्यासाठी,”तू आरोपी असून खाली बस”असे अद्वताद्वा बोलून दरडावले मग हे महाशय टाळ्यावर आले.व त्यांनी नांगी टाकली असता पोलिसांनी त्यांना अटक करून कोपरगाव प्रथम न्यायदंडाधिकासमोर हजर केले असता तेथेही चौकशी अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल करण्यास उशीर केल्याने न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्यांना फटकारले असल्याची बातमी आहे.हि सुनावणी झाली असता पुन्हा हे महाशय न्यायालयाच्या मागच्या दाराने न्यायालयाच्या आत आल्यावर पुन्हा न्यायालयाने त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.पुढे चौदा दिवस न्यायालयीन कोठडी सूनावल्यावर मात्र यांची बोबडीच वळली असून त्या दोन रात्री हे महाशय अत्यंत अस्वस्थ असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.पहिल्या रात्री मग यांच्या शिर्डीतील आजी-माजी पदाधिकारीं नातेवाईकांनी फिर्यादि नानासाहेब औताडे यास पोलीस ठाणे परिसरात गाठवून हा खटला मागे घेण्यासाठी पहाटे एक वाजेपर्यंत प्रयत्न केला असल्याची माहिती आहे.दरम्यान फिर्यादीचे या मंडळींनी मोठे आमिष दाखवून मनही वळवले होते.मात्र फिर्यादीने आपल्याला काहीही नको मात्र या चुकीची शिक्षा म्हणून गावात यांना घेऊन यांना गावात ग्रामस्थासमोर शिक्षा (?) (एक विशिष्ट अट घातली) दिल्यावर आपण माघार घेऊ अशी अट घातल्याने त्यास या मध्यस्थ नातेवाईकांनी नकार दिला असल्याचे वृत्त आहे.याबाबत आपल्या कोपरगावस्थित वकिलाला फिर्यादीने फोन करून याबाबत सल्ला मागितला असता त्यांनी त्यांना कडक शब्दात फिर्यादीला समज दिल्यावर फिर्यादी महोदय भानावर आले व त्यांनी या खटल्यातून मागे जाण्याचा रस्ता बंद करून टाकला.त्यामुळे या प्रमुख कार्यकर्त्यांचे सगळे मुसळ केरात गेले आहे.व फिर्यादी याने जो पर्यंत चारही आरोपींना पोलीस अटक करत नाही तो पर्यंत घरी जाण्यास नकार दिला होता.त्यामुळे पोलिसांना या चारही आरोपींना रात्री एक वाजता अटक करावी लागली आहे.हे सगळे संपल्यावर मग हे प्रमुख आरोपी हताश झाले न निराशेत गेल्यावर या आरोपीच्या शिर्डी येथील नातेवाईकाने मग कारागृहातून सोडण्यासाठी एक शक्कल लढवल्याची बातमी असून प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्याचे वृत्त आहे.दुसऱ्या दिवशी पुन्हा ‘या’ प्रकरणी सुनावणी होऊन या महाशयांना जामीन मिळाला आहे.