गुन्हे विषयक
अवैध मांजा विक्री,सांगवी भुसार येथील दुकानदारावर गुन्हा
![](https://newsseva.in/wp-content/uploads/2021/01/20210115_172421.jpg)
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पर्यावरणाचे व पशु पक्षांचे व मनुष्याचे नुकसान होऊ शकते हे माहिती असूनही व मांजा विक्रीस शासनाचा प्रतिबंध असतानाही कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथील अथर्व किराणा दुकानात आरोपी सागर मच्छीन्द्र जोर्वेकर वय-३१ याने अनाधिकाराने मांजा विक्री केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने अवैध मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांत खळबळ उडाली आहे.
बऱ्याच ठिकाणी किराणा व अन्य दुकानदार चिनी मांजा आर्थिक फायद्यासाठी चोरी-छिपे विक्री करताना दिसत आहे.परिणामस्वरूप त्यातून एखादा दुचाकीस्वार,महिला,बालक आदींचा बळी जात असतानाच्या घटना वर्तमानपत्रात व सामाजिक संकेतस्थळावर नागरिकांना वाचावयास मिळत आहे.अनेकांना या ह्या चिनी मांजामुळे जीव गमवावा लागला असल्याच्या घटनांची नोंदी कोपरगाव शहर व तालुक्यातील पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आहेत.याची गंभीर दखल कोपरगाव तालुका पोलिसांनी घेतली आहे.
मकर संक्रांतीला पतंग उडविण्याची परंपरा तशी जुनी असून नुकताच मकर संक्रांतीचा सण उत्साहात संपन्न झाला आहे.या उत्साहाला तरुणांबरोबर वडील धारी मंडळीही पतंग उडविण्याची हौस भागवून घेताना दिसून येतात.मात्र या उत्सवात चिनी मांजा मात्र जीवघेणा ठरत असल्याने त्यास राज्य शासन निर्णय क्रमांक सी.आर.टी.-२०१५- प्र,क्रं.-३७,ता.क.-२ दि.१८ जून २०१६ अन्वये विक्रीसाठी प्रतिबंध घातला आहे.तरीही बऱ्याच ठिकाणी किराणा व अन्य दुकानदार तो आर्थिक फायद्यासाठी चोरी-छिपे विक्री करताना दिसत आहे.परिणामस्वरूप त्यातून एखादा दुचाकीस्वार,महिला,बालक आदींचा बळी जात असतानाच्या घटना वर्तमानपत्रात व सामाजिक संकेतस्थळावर नागरिकांना वाचावयास मिळत आहे.अनेकांना या ह्या चिनी मांजामुळे जीव गमवावा लागला असल्याच्या घटनांची नोंदी कोपरगाव शहर व तालुक्यातील पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आहेत.याची गंभीर दखल कोपरगाव तालुका पोलिसांनी घेतली असून त्यांना एका खबऱ्या मार्फत सांगवी भुसार येथील एक दुकानदार केवळ पैशाच्या मोहातून चिनी मांजा विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी त्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांमार्फत कारवाई करून त्या अथर्व किराणा दुकानातून चारशे पन्नास रुपये किमतीचे ड्रॅगन एक्सपोर्ट क्वालिटी थ्रेड नाव असलेला नायलॉन मांजाचे तीस रीळ,जप्त केले आहे.व आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी फिर्यादी पो.कॉ.जयदीप दामोदर गवारे (वय-३४)यांनी आरोपी सागर मच्छीन्द्र जोर्वेकर याचे विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२५-२०२१ भा.द.वि.कलम सह पर्यावरण (संरक्षण)अधिनियम १९८६ कलम ५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.प्रभाकर काशीद हे करीत आहेत.