गुन्हे विषयक
अवैध दारू अड्यांवर पोलिसांचे छापे,तीन गुन्हे दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील एकोणतीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न होत असून या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका पोलीसांनी गावोगाव धाड सत्र राबवले असून मळेगाव थडी,भोजडे,कोळगाव पाटी आदी ठिकाणी धाडी टाकून त्या ठिकाणी अवैध दारूचा साठा जप्त केला असून आरोपी बाबासाहेब सोन्याबापू डुकरे रा.मळेगाव थडी,राजू उर्फ राजाराम सखाराम पवार रा. भोजडे व उत्तम मुरलीधर चव्हाण रा.कोळगाव पाटी या तिघांवर गुन्हे दाखल केल्याने अवैध दारू व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे.
मळेगाव थडी,भोजडे,कोळगाव पाटी आदी ठिकाणी धाडी टाकून त्या ठिकाणी अवैध दारूचा साठा जप्त केला असून आरोपी बाबासाहेब सोन्याबापू डुकरे रा.मळेगाव थडी,राजू उर्फ राजाराम सखाराम पवार रा. भोजडे व उत्तम मुरलीधर चव्हाण रा.कोळगाव पाटी या तिघांवर गुन्हे दाखल केल्याने अवैध दारू व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे.यातील पहिले दोन आरोपी घटना स्थळावरून फरार झाले आहेत.
राज्यात ३४ जिल्ह्यांमधील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूकीचा प्रचाराच्या तोफा काल सांगता सभांनी थंडावल्या आहेत.व शुक्रवार दि.१५ जानेवारी रोजी निवडणूक संपन्न होत आहे.या पार्श्वभूमीवर आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता.त्यामुळे राज्यातील सर्वत्र काल सांगता सभा संपन्न झाल्या असून त्याला कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायती अपवाद नाही.त्यामुळे आता शेवटचा दिवस असल्याने या दिवशी कत्तलची रात्र असून या दिवशी मतदारांना आमिषे दाखवून आपल्याकडे वळविण्याचे नाना फंडे राजकीय नेते व कार्यकर्ते राबवित असतात त्यात अवैध दारू व पैसा हा महत्वाचा घटक ठरत असतो.त्यामुळे य आमिषाला मतदार बऱ्यापैकी बळी पडतात हा सार्वत्रिक अनुभव आहे.याला कोपरगाव तालुका अपवाद नाही.त्यामुळे पोलीस बऱ्यापैकी सतर्क झाले आहे.त्यातूनच त्यांनी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली हि मोहीम राबविली आहे.त्यात मळेगाव थडी,भोजडे,कोळगाव पाटी आदी ठिकाणी धाडी टाकून त्या ठिकाणी अवैध दारूचा साठा जप्त केला असून आरोपी बाबासाहेब सोन्याबापू डुकरे रा.मळेगाव थडी,राजू उर्फ राजाराम सखाराम पवार रा. भोजडे व उत्तम मुरलीधर चव्हाण रा.कोळगाव पाटी या तिघांवर गुन्हे दाखल केल्याने अवैध दारू व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे.दरम्यान यात मळेगाव थडी येथील धाडीत पंधरा बाटल्या किंमत ७८० रुपये,भोजडे येथील धाडीत सतरा देशी बाटल्या रुपये किंमत ८८४ तर कोळगाव पाटी येथील कारवाईत ५२० रुपयांच्या दहा बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.दरम्यान यातील आरोपी बाबासाहेब डुकरे व राजू पवार हे घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
या प्रकरणी फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल युवराज मारुती खुळे,बाळासाहेब भाऊराव धोंगडे,अनिष अब्दुल शॆख आदींनी विविध गुन्हे दाखल केले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर काशीद,आर.एम.म्हस्के,पोलीस नाईक बी.एल.ढाका हे करीत आहेत.