गुन्हे विषयक
..या आदिवासी आश्रम शाळेत मोठी चोरी !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत असललेल्या आदिवासी आश्रम शाळेत अज्ञात चोरट्यांनी शाळेतील दोन एल.ई.डी.दूरदर्शन संच,एक इन्व्हर्टर दोन सिलिंग फॅन असा ५६ हजारांचा अवैज लंपास केला आहे.या प्रकरणी फिर्यादी ज्ञानदेव पाराजी औताडे (वय-५७) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत एक पोहेगाव येथील माजी आ.कै. दादा पाटील रोहमारे यांनी साधारण १९८८ साली स्थापन केलेली आश्रम शाळा असून या ठिकाणी अनेक विद्यार्थी शाळेचे शिक्षण घेतात.या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य घडविले आहे.मात्र हि शाळा आता चोरट्यांच्या निशाण्यावर आली असल्याचे दिसत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत एक पोहेगाव येथील माजी आ.कै. दादा पाटील रोहमारे यांनी साधारण १९८८ साली स्थापन केलेली आश्रम शाळा असून या ठिकाणी अनेक विद्यार्थी शाळेचे शिक्षण घेतात.या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य घडविले आहे.मात्र हि शाळा आता चोरट्यांच्या निशाण्यावर आली असल्याचे दिसत आहे.कोपरगाव शहरात चोरट्यानी उपद्रव माजवला असताना आता त्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागात वळवला असल्याचे दिसून येत आहे.त्यातील एक चोरीचा प्रकार चांदेकसारे येथे झगडे फाटा याठिकाणी घडला आहे.शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या सोनी व व्हिडीओकॉन असे अनुक्रमे दोन एल.ई.डी.दुरदर्शन संच,दोन इलेक्टरीक पंखे व दोन इन्व्हर्टर आदींवर चोरट्यांची वाकडी नजर पडली आहे.हि घटना दि.२७ डिसेंबरच्या रात्री घडली आहे.या चोरीच्या घटनेत वरील ऐवज त्याची किंमत ५६ हजार असून याबाबत गुन्हा मात्र उशिरा दाखल झाला आहे.त्याबाबत फिर्यादी यांनी आधी या वस्तूंचा शोध घेऊन पाहिला मात्र त्या मिळून आल्या नाहीत.याखेरीज फिर्यादी यांचे महाराष्ट्र राज्य अदिवासी विकास विभागाचा खावटी अनुदान वाटपाचे काम सुरु असल्याने हा गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी अज्ञात चोरट्यांचा विरुद्ध गु.र.क्रं.१२-२०२१ भा.द.वि.कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.व चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.पुढील तपस पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए.बी.बाबर हे करीत आहेत.