गुन्हे विषयक
घरात घुसून दहा वर्षीय मुलीचा विनयभंग
श्रीरामपूर शहरातील प्रभाग एक मध्ये घरात घुसून १० वर्षे वयाच्या मुलीचा घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
आपली दहा वर्षाची मुलगी घरात काम करीत असताना राजू जाधव ( वय-२०) याने घरात घुसून एकटी असल्याचा फायदा घेत तिला लज्ज उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.याबाबत आरोपी विरुद्ध बालकांचा लैंगिक अत्याचार व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून.आरोपीला अटक केली आहे.
सदर मुलीच्या आईने याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून,त्यात म्हटले आहे बुधवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी हायस्कुल जवळ आपले घर आहे.यावेळी आपली दहा वर्षाची मुलगी घरात काम करीत असताना राजू जाधव ( वय-२०) याने घरात घुसून एकटी असल्याचा फायदा घेत तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.याबाबत आरोपीविरुद्ध बालकांचा लैंगिक अत्याचार व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून.आरोपीला अटक केली असून त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.याबाबत पुढील तपास स्वतः आय.पी.एस.पोलीस अधिकारी आयुष नोपाणी करीत आहेत.