गुन्हे विषयक
भाऊबीजेवरून उशिरा आली म्हणून सुनेस मारहाण,गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आपली सून भाऊबीजेस गेली ती निर्धारित वेळेत आली नाही याचा राग मनात धरून तिचा नवरा अनिल उत्तम गंगावणे,सासू मुक्ताबाई उत्तम गंगावणे,सासरा उत्तम रंगनाथ गंगावणे,नणंद स्वाती दीपक इंगळे सर्व रा.हिंगणी या सासरच्या मंडळींनी फिर्यादी सून सुरेखा अनिल गंगावणे (वय-१९) हिला दि.२२ नोव्हेम्बर रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास सासरी शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण केली त्यात तिच्या पोटात लाथा मारल्याने तिचा गर्भपात झाला आहे.तिने याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.व तिच्यावर खाजगी व सरकारी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती प्राप्त झाल्याने हिंगणी परिसरात खळबळ उडाली आहे.
भाऊबीजेला आपल्या पोहेगाव येथील माहेरी आपला नवरा व सासू-सासरे यांना विचारून गेली होती.मात्र येताना तिला काही कारणांनी उशीर झाला होता.ती संधी साधत व याचा राग मनात धरून तिचा नवरा,सासू,सासरा,सर्व रा.हिंगणी या सासरच्या मंडळींनी फिर्यादी सून सुरेखा अनिल गंगावणे (वय-१९) हिला दि.२२ नोव्हेम्बर रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास सासरी शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण केली त्यात तिच्या पोटात लाथा मारल्याने तिला अतीव वेदना होऊन तिचा गर्भपात झाला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील फिर्यादी महिला हिचे माहेर हे पोहेगाव ता.कोपरगाव येथील असून तिचे काही महिन्यांपूर्वी हिंगणी येथील तरुण अनिल गंगावणे या तरुणाशी झाले होते.नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर त्यांनी आता त्रास देण्याचे काम सुरु केले असल्याचे निष्पन्न होत आहे.नुकताच दीपावलीचा सण मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.या सणाला दिवाळी संपन्न झाल्यावर महिला आपल्या माहेरी जाण्यासाठी उत्साहात असतात.त्याला फिर्यादी महिला हि अपवाद नव्हती.ती भाऊबीजेला आपल्या पोहेगाव येथील माहेरी आपला नवरा व सासू-सासरे यांना विचारून गेली होती.मात्र येताना तिला काही कारणांनी उशीर झाला होता.ती संधी साधत व याचा राग मनात धरून तिचा नवरा अनिल उत्तम गंगावणे,सासू मुक्ताबाई उत्तम गंगावणे,सासरा उत्तम रंगनाथ गंगावणे,नणंद स्वाती दीपक इंगळे सर्व रा.हिंगणी या सासरच्या मंडळींनी फिर्यादी सून सुरेखा अनिल गंगावणे (वय-१९) हिला दि.२२ नोव्हेम्बर रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास सासरी शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण केली त्यात तिच्या पोटात लाथा मारल्याने तिला अतीव वेदना होऊन तिचा गर्भपात झाला आहे.तिला माहेरच्या मंडळींनी आधी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले व त्यानंतर तिला खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले असून तेथे तिच्यावर उपचार सुरु आहे.त्या मुळे तिने आपल्या माहेरच्या नातेवाईकांच्या सहाय्याने काल उशिरा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी वरील आरोपी नवरा,सासू,सासरा,नणंद आदी चार जणांविरुद्ध गु.र.क्रं.५४५/२०२० भा.द.वि.कलम ३१२,३१३,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे करीत आहेत.