गुन्हे विषयक
डोऱ्हाळेंत एकाचा खून,तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सिन्नर तालुक्यातील पाथरे ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या योगेश सोपान दवंगे (वय-२८) या तरुणांचा डोऱ्हाळे येथील आरोपी चांगदेव पुंजा डांगे,शंकर चांगदेव डांगे,अमोल चांगदेव डांगे या तीन आरोपींनी शिवा रहाणे याचे घेतलेल्या पैशाच्या कारणावरून हातातील धारधार शस्राने उजव्या बाजूने पोटावर,छातीवर उजव्या हातावर करून जखमी करून खून केल्याचा खळबळ जनक गुन्हा फिर्यादी प्रवीण माधव घारे (वय-२५) याने दाखल केल्याने राहाता,कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी शिर्डी पोलिसानी आरोपीवर गुन्हा दाखल करून आरोपीना अटक केली आहे.
फिर्यादी प्रवीण घारे रा.शहापूर ता.कोपरगाव याने व मयत योगेश सोपान दवंगे यांनी आरोपीं शंकर चांगदेव डांगे याचेकडून शिवा रहाणे याचे पैसे उसनवारी घेतले होते.ते त्याने वेळेवर दिले नाही त्यावरून हा वाद झाला असल्याचे समजते.त्यावरून हि झटापट डॊऱ्हाळे या ठिकाणी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास होऊन हा खून झाला असल्याचे समजते.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी प्रवीण घारे रा.शहापूर ता.कोपरगाव याने व मयत योगेश सोपान दवंगे यांनी आरोपीं शंकर चांगदेव डांगे याचेकडून शिवा रहाणे याचे पैसे उसनवारी घेतले होते.ते त्याने वेळेवर दिले नाही त्यावरून हा वाद झाला असल्याचे समजते.त्यावरून हि झटापट डॊऱ्हाळे या ठिकाणी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास झाली त्यातून आरोपीनीं मयत योगेश दवंगे व त्याचा सहकारी फिर्यादी प्रवीण घारे त्यांच्याकडून ते मात्र वेळेवर परत गेले नाही.त्याचा राग मनात धरून आरोपी चांगदेव पुंजा डांगे,व त्याचे दोन मुले शंकर चांगदेव डांगे,अमोल चांगदेव डांगे या तीन आरोपींनी मयत योगेश दवंगे व फिर्यादी प्रवीण घारे यास शिवीगाळ करून त्यांच्याशी झटापट करून फिर्यादी प्रवीण घारे यास पकडून चांगदेव डांगे याने त्याच्या हातातील धारदार हत्याराने फिर्यादीचे पोटावर व उजव्या बाजूस फिर्यादिस जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.तर शंकर डांगे याने आपल्या हातातील हत्याराने मयत योगेश दवंगे याच्या छातीवर उजव्या बाजूस वार करून जखमी करून त्याचा खून केला आहे.
घटनास्थळी शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,राहाता येथील पोलिस निरीक्षक श्री भोये,सहाय्यक पोलीस निरीक्षक मुथुन घुगे प्रवीण दातरे,पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे यांनी करीत आहेत.या घटनेत फिर्यादी घारे हा स्वतः जखमी झाला आहे.त्यानां आधी पोहेगाव व नंतर शिर्डी येथील साई संस्थान रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारापूर्वीच योगेश दवंगे याचे निधन झाल्याचे वृत्त आहे.या घटनेत अद्याप अनेक कंगोरे उघड होणे बाकी दिसत असून यातून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता दिसत आहे.
या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गु.र.क्रं.७५५/२०२० भा.द.वि.कलम ३०२,३०७,५०४ प्रमाणे आरोपी चांगदेव पुंजा डांगे,व त्याचे दोन मुले शंकर चांगदेव डांगे,अमोल चांगदेव डांगे या तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याना अटक केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे हे करीत आहेत.