गुन्हे विषयक
सव्वा लाखांच्या म्हशींची चोरी,तिघांवर गुन्हा दाखल

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील गोखरुबाबा गल्लीतील गणेश बोरुडे यांच्या मोकळ्या प्लॉट मधील ०१ लाख २५ हजार रुपये किमतीच्या दोन जाफराबादी म्हशी आरोपी आकाश संजय रोकडे,हरीश चंद्रकांत कुऱ्हाडे,सचिन गायकवाड (पूर्ण नाव उपलब्ध नाही) यांनी मंगळवार दि.२४ नोव्हेम्बरच्या रात्री अज्ञात साधनाने पळवून नेल्याची फिर्याद अजहर इस्माईल शेख (वय-२४) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कोपरगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी यांचा म्हशी पालनाचा व्यवसाय आहे.त्यांचेकडे दोन जाफराबादी म्हशी असून त्या त्यांनी गणेश बोरुडे यांच्या मोकळ्या प्लॉट मध्ये पालनासाठी बांधलेल्या होत्या व ते आपल्या घरी रात्री उशिरा पर्यंत त्यांचे लक्ष होते.मात्र रात्री आठ वाजेनंतर ते आपल्या घरी गेले असता त्या संधीचा शोधात असलेले आरोपीनी संधी साधली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी अजहर शेख यांचा म्हशी पालनाचा व्यवसाय आहे.त्यांचेकडे दोन जाफराबादी म्हशी असून त्या त्यांनी गणेश बोरुडे यांच्या मोकळ्या प्लॉट मध्ये पालनासाठी बांधलेल्या होत्या व ते आपल्या घरी रात्री उशिरा पर्यंत त्यांचे लक्ष होते.मात्र रात्री आठ वाजेनंतर ते आपल्या घरी गेले असता त्या संधीचा शोधात असलेले आरोपी आकाश रोकडे, हरीश कुऱ्हाडे,सचिन गायकवाड आदींनी त्या म्हशीजवळ कोणी नाही असे पाहून त्या म्हशी रातोरात पळवून नेल्या असल्याचा आरोप फिर्यादी अजहर शेख यांनी केला आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.८२५/२०२० भा.द.वि.कलम ३७९ ३४ प्रमाणे आरोपी आकाश रोकडे, हरीश कुऱ्हाडे,सचिन गायकवाड या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.