जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात दोन गटात दगडफेक,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या दत्तनगर परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिची बहिण या सार्वजनिक शौचालयात गेल्या असता त्या परिसरात राहणाऱ्या आरोपीनी त्या ठिकाणी फटाके फोडले असल्याने व तशी या अल्पवयीन मुलींनी आपल्या पालकांकडे तक्रार केल्याने दोन गटात भांडण व त्याचें रूपांतर दगड फेकीत झाल्याने कोपरगाव शहर पोलिसांनी आरोपी ,मोद्या मंजुळ,सोन्या मंजुळ, गटर मंजुळ, विशाल गायकवाड व त्याच्या सहकाऱ्यां विरुद्ध गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

आरोपी मोद्या मंजुळ,सोन्या मंजुळ, गटर मंजुळ, विशाल गायकवाड यांनी अल्पवयीन मुलगी व तिची बहिण या सार्वजनिक सौचालयात गेल्या असता त्या ठिकाणी विनयभंग काही आचरट तरुणांनी आदल्या दिवशी फटाका फोडुन व असभ्य वर्तन केले आहे.तर काल सायंकाळी त्या सौचालयात गेल्या असता त्यातील एकीचा हात पकडून दरवाजावर थाप मारून विनयभंग केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,मोद्या मंजुळ,सोन्या मंजुळ, गटर मंजुळ, विशाल गायकवाड यांनी अल्पवयीन मुलगी व तिची बहिण या सार्वजनिक सौचालयात गेल्या असता त्या ठिकाणी विनयभंग काही आचरट तरुणांनी आदल्या दिवशी फटाका फोडुन व असभ्य वर्तन केले आहे.तर काल सायंकाळी त्या सौचालयात गेल्या असता त्यातील एकीचा हात पकडून दरवाजावर थाप मारून विनयभंग केला आहे. या बाबत त्यांनी या खोडसाळ पणाची तक्रार आपल्या घरच्या नातेवाईकांकडे केली.त्याचा जाब विचारण्यासाठी काही तरुण गेले असता विरोधी लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली आहे. ही घटना बुधवार १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे.

या बाबत चौघांवर दगडफेक व विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला असुन वरील आरोपींची केलेल्या दगडफेकीत अमोल दिलीप विघे राहणार गोरोबानगर व बशीर बागवान हे गंभीर जखमी झाले आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यातील सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की,” दत्तनगर भागात राहणाऱ्या या दोन बहिणी सार्वजनिक शौचालयात गेल्या असता वरील चौघे आरोपी यांनी त्यांच्याशी लगट करून फिर्यादीच्या बहिणीचा हात धरून ओढले. फिर्यादी व तिची बहिण शौचालयात पळत गेल्या असता आरोपी यांनी त्यांच्या पाठीमागे जाऊन शौचालयाच्या दरवाजावर थापा मारून उघडा उघडा असे म्हणून विनयभंग करून दमदाटी केली.त्यांनी आपण याची तक्रार भावकडे करू असा इशारा दिला असता त्यांनी आम्ही तुझ्या भावलाच काय बापालाही घाबरत नाही असे उद्घट उत्तर दिले तसेच या घटनेचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या लोकांवर दगडफेक केली. यात अमोल विघे व बशीर बागवान यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घडलेल्या घटनेबाबत वरील चौघांवर शहर पोलिस ठाण्यात गु.क्रं.व कलम ८१४/२०२० कलम ३५४,३५४ (अ), ३५४(ड), ३२४, ३३७, ३२३,५०४, ३४ व बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८/१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव,तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक अनिल कटके, शहर पोलिस ठाण्याचे स.पो.नि.दिपक बोरसे यांनी भेट दिली आहे. यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.मात्र अन्य एक आरोपी फरार आहे.वर्तमान परिस्थिती निवळली असली तरी तणाव पूर्ण शांतता आहे. पुढील तपास स.पो.नि.दीपक बोरसे हे करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close