गुन्हे विषयक
कोपरगावात अल्पवयीन मुलीस पळविले,गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरानाजीक शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या संजीवनी औद्योगिक वसाहतीत नोकरी करत असलेल्या इसम (वय-४५) यांची अल्पवयीन मुलगी हि सोमवार दि.०२ नोव्हेंबर रोजी सकाळी ०९ वाजेपासून ते सायंकाळी ०७ वाजेच्या दरम्यान अज्ञात ईसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे शिंगणापूर व कोपरगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
या बाबत आज सायंकाळी उशिराने अपहरीत मुलीच्या पित्याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.८०७/२०२० भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.व त्यात आपल्या कायदेशीर रखवालीतून अज्ञात इसमाने अज्ञात अकारणासाठी आपल्या मुलीस पळवून नेले असल्याचे म्हटले आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ए. एम.दारकुंडे हे करीत आहेत.