
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
या बाबत सविस्तर वृत्त असे की,”संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत दशरथवाडी मयत सचिन जगताप हे आपल्या कुटुंबासमवेत रहात असताना काल रात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांच्या खोलीत कोणी नाही हे पाहून त्यांनी लोखंडी अंगलला दोर बांधून आपली जीवन यात्रा संपवली आहे.हि बाब त्यांच्या घरच्या नातेवाईकांना सकाळी उठल्यावर लक्षात आली त्यांनी.त्यांनी त्यास तातडीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असता तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.त्यांच्या पच्छात वडील,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.
या प्रकरणी मृतांचा पिता अशोक जगताप यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यू दप्तर नोंद क्रं.५१/२०२० सि.आर.पी.सी.१७४ प्रमाणे याची नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.आर.ए.एम.दारकुंडे हे करीत आहेत.