जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

चोऱ्या केल्याने बदनामी होते,म्हटल्याचा राग,बेदम मारहाण

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  “तुम्ही चोऱ्या केल्याने त्यामुळे मला देखील त्रास होतो,त्यात आमची बदनामी होते” असे म्हटल्याचा राग येऊन आपल्याला आरोपी घायतळ बलांडी भोसले,आहीदा घायतळ भोसले दोन्ही रा.उंदीरवाडी ता.येवला,प्रविण विकास भोसले रा.शिंगणापुर,कमा पड्या काळे रा.लक्ष्मीनगर आदीं चार आरोपीनी शिंगणापूर हद्दीत असलेल्या हिरे वस्तीजवळ वनजमिनीत बसलेले असताना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचा अदखलपात्र गुन्हा शिंगणापूर येथील फिर्यादी शुभम शाहीरी चव्हाण (वय-28 वर्षे) याने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.

 

काही वर्षापूर्वी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक पदी असताना दौलतराव जाधव यांनी श्रीगोंदा तालुक्यानंतर पारधी समाजात जनजागृती करून गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न केला होता.त्याला चांगलेच यश आले होते.त्यामुळे त्या समाजातील अनेकांनी गुन्हेगारी सोडून आपले साधे जीवन जगण्यास सुरुवात केली होती.त्यांचे अधिवासाचे जागी चलचित्रण सुरू करून त्यांचेवर येणारे वारंवार कारण नसतांचे बालट कमी करण्याचा प्रयत्न केला होता त्याला चांगले यश आले होते.त्यामुळे बरेच जण मुख्य प्रवाहात आले होते.मात्र वर्तमानात पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा एकदा गुन्हेगारांचे फावताना दिसून येत आहे.

   कोपरगाव शहर आणि परिसरात गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे.त्यामुळे नागरीकांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे.महिलांचे दागिने ओरबाडून पळणे,घरफोड्या करणे,रस्ता लूट आदी गुन्ह्यात लक्षणीय वाढ झाली आहे.त्यामुळे नुकतीच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिलेल्या आदेशाने आ.आशुतोष काळे यांनी शहर पोलिस ठाण्यात नुकतीच एक आढावा बैठक घेतली आहे.त्यामुळे पोलिसांवर चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचा दबाव वाढला आहे.त्यातच चोरट्यांत आपसापासात भांडणे उघड होताना दिसून येत असल्याची घटना उघडकीस आली आहे.यातील फिर्यादीने गुन्हा दखल केल्याने ही घटना उघडकीस आली आहे.

  काही वर्षापूर्वी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक पदी असताना दौलतराव जाधव यांनी श्रीगोंदा तालुक्यानंतर पारधी समाजात जनजागृती करून गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न केला होता.त्याला चांगलेच यश आले होते.त्यामुळे त्या समाजातील अनेकांनी गुन्हेगारी सोडून आपले साधे जीवन जगण्यास सुरुवात केली होती.त्यांचे अधिवासाचे जागी चलचित्रण सुरू करून त्यांचेवर येणारे वारंवार कारण नसतांचे बालट कमी करण्याचा प्रयत्न केला होता त्याला चांगले यश आले होते.त्यामुळे बरेच जण मुख्य प्रवाहात आले होते.मात्र वर्तमानात पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा एकदा गुन्हेगारांचे फावताना दिसून येत आहे.त्यामुळे गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढत असताना दिसून येत आहे.अशीच एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

  त्यात फिर्यादीने म्हटले आहे की,”आपण शिंगणापूर येथील रेल्वे स्थानकजवळ रहिवासी असून आपण व आपली आई आग्याबाई शाहीरी चव्हाण,पत्नी छकुली शुभम चव्हाण असे आम्ही एकत्र राहतो व मजुरीचे काम करतो.आज दि.21ऑक्टोबर रोजी 10.30 वाजण्याचे सुमारास आरोपी घायतळ बलांडी भोसले रा.उंदीरवाडी,प्रविण विकास भोसले रा.शिंगणापुर,कमा पड्या काळे रा.लक्ष्मीनगर,कोपरगाव,आहीदा घायतळ भोसले रा.उंदीरवाडी ता.येवला असे शिंगनापुर येथे हिरे वस्ती जवळच्या वन विभागाच्या जमिनीमध्ये बसलेले होते.आपण तेथुन जात असताना त्यांना सांगितले की,”तुम्ही चोऱ्या करता,त्यामुळे मला देखील त्रास होतो.आमची देखील बदनामी होते.पोलीस आमच्या घरी येतात असे समजाऊन सांगितले असता त्यांचा त्यांना राग आल्याने त्यांनी मला लाथाबुक्याने मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली व परत आमच्या नादी लागला तर जिवे मारीण अशी धमकी दिली असल्याचे म्हटले आहे.

  दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 115(1)352,351(3) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे,यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close