जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महाठग खरात अखेर भोवला,समताच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा!

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  राज्यातील नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांना आणि त्यांच्या महिलांना अडचणीत आणणारा नाशिक जिल्ह्यातील महाठग अशोक खरात आणि सहकारात अग्रणी असलेल्या समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या राहाता शाखेच्या व्यवस्थापकाविरुद्ध अखेर आज मुंबई येथील हॉटेलचालक दिनेश मानाजी परब (वय-५१) यांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

“आरोपी अशोककुमार एकनाथ खरात रा.नाशिक व समता नागरी सहकारी मर्या.पतसंस्था शाखा राहाताचे व्यवस्थापक यांनी दि.२५ मे २०२१ रोजी समता नागरी सहकारी मर्या.पतसंस्था,राहाता या शाखेतील पतसंस्थेत फिर्यादी व फिर्यादीची पत्नी यांचे बनावट सह्या करुन बनावट खाते उघडुन,त्यावर मोठमोठ्या रकमेचा व्यवहार केला आहे.तसेच समता नागरी सहकारी मर्या.पतसंस्था राहाता या पतसंस्थेचे व्यवस्थापक यांनी फिर्यादी व फिर्यादीची पत्नी यांचे कागदपत्रांची व आम्ही प्रत्यक्ष हजर नसल्याची,त्यांची ओळखीची खात्री न करता पतसंस्थेत खाते उघडुन घेतले आहे.तसेच उघडलेल्या बनावट खात्यावर व्यवहार करुन फिर्यादी व फिर्यादीची पत्नीची फसवणुक केली असल्याचे म्हटले आहे.

  महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरात याचे नवनवे कारनामे समोर येत असून आता आर्थिक व्यवहारांच्या बाबतीतही अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले आहे.त्याने अनेक नागरिकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्डची माहिती वापरून खरातने कोपरगाव नगरीत मोठ्या आर्थिक व्यवहारांचे जाळे उभे केल्याचा संशय एस.आय.टी.ला आहे.त्यात कोपरगाव येथील काही कोटींच्या ठेवीचा दावा करणाऱ्या माध्यमांत आघाडीच्या समता सहकारी पतसंस्थेचे नाव समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली होती.त्यात रुपाली चाकणकर यांच्या बहिण प्रतिभा चाकणकर यांचे नावाने एक खाते असून त्यात हा भोंदूबाबा स्वतःचा मोबाईल क्रमांक वापरून व्यवहार करत असल्याच्या बातम्या दूरचित्रवाणीवर गेले काही सुरू होत्या.त्यामुळे कोपरगावसह उत्तर नगर जिल्ह्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.त्याबाबत दोन दिवसापूर्वी समता सहकारी पतसंस्थेत संचालक संदीप कोयटे यांनी दोन दिवसापूर्वी आमच्या संस्थेत १५ कोटी रुपयांच्या ठेवी असल्याचा खुलासा केला होता.तर त्यानंतर बाहेर दौऱ्यावर असलेले त्यांचे पिताश्री आणि संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे हे कोपरगावात आल्यावर त्यांनी काल तातडीने पतसंस्थेच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.त्यात ५-६ कोटींच्या ठेवी होत्या आणि आता त्याचे खात्यात केवळ ३५ लाख रुपये असल्याची माहिती दिली होती.व आमच्या संस्थेचे व्यवहार चोख असल्याचा निर्वाळा दिला होता.त्याला २४ तास उलटत नाही आणि त्या बातम्यांची शाई वाळत नाही तोच आज राहाता येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.तर आज पुन्हा एकदा या प्रकरणाचा दुसरा पैलू उघड झाला असून समताच्या राहाता तालुक्यातील शाखेतील व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  त्यात त्यांनी म्हटले आहे की,”आरोपी नामे अशोककुमार एकनाथ खरात रा.नाशिक व समता नागरी सहकारी मर्या.पतसंस्था शाखा राहाताचे व्यवस्थापक यांनी दि.२५ मे २०२१ रोजी समता नागरी सहकारी मर्या.पतसंस्था,राहाता या शाखेतील पतसंस्थेत फिर्यादी व फिर्यादीची पत्नी यांचे बनावट सह्या करुन बनावट खाते उघडुन,त्यावर मोठमोठ्या रकमेचा व्यवहार केला आहे.तसेच समता नागरी सहकारी मर्या.पतसंस्था राहाता या पतसंस्थेचे व्यवस्थापक यांनी फिर्यादी व फिर्यादीची पत्नी यांचे कागदपत्रांची व आम्ही प्रत्यक्ष हजर नसल्याची,त्यांची ओळखीची खात्री न करता पतसंस्थेत खाते उघडुन घेतले आहे.तसेच उघडलेल्या बनावट खात्यावर व्यवहार करुन फिर्यादी व फिर्यादीची पत्नीची फसवणुक केली आहे.मात्र फिर्यादीत पोलिसांनी समताचे राहाता शाखेच्या व्यवस्थापक यांचे नाव उघड केलेले नाही.

दरम्यान फिर्यादी इसमाच्या  फिर्यादीवरुन वरुण राहाता पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा रजिस्टर क्र.१२१/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३१८(२),३१८(४),३१९,३३६(२)३३८,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे,पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांचे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close