गुन्हे विषयक
निवडणुकीतील..’तो’ कुडमुड्या ज्योतिषी कोण ?

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत निवडणूक लढविण्याचा सल्ला एका ज्योतिषाने दिला असून त्यात आपण विजयी होणार आहे.असे जाहीर प्रचार सभात राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी जगजाहीर केले होते.आता त्याबाबत वृत्त वाहिन्यावर कोयटे आणि भोंदू अशोक खरात यांचे तीन वर्षांपूर्वीचे त्याचा सत्कार करताना आणि दर्शन घेतल्याचे चलचित्रण समोर आल्याने निवडणूक लढवण्याचा सल्ला देणारा..’तो’ कुडमुड्या ज्योतिषी हा भोंदू अशोक खरात तर नाही ना ? अशी कोपरगाव शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत आ.आशुतोष काळे गटाकडून कृष्णाई मंगल कार्यालयात राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी आ.आशुतोष काळे गटात प्रवेश करून राजकीय वर्तुळात मोठा भूकंप घडवला होता.त्यांनी आपल्या पहिल्यावहिल्या भाषणात आपल्याला,” एका प्रसिद्ध ज्योतिषाने आपल्या राजकीय आयुष्यात ही चाळीस वर्षांनी होणारी निवडणूक लढविण्याचा सल्ला दिला असून आपण यात विजयी होणार असल्याची भविष्यवाणी केली होती.त्यावेळी अनेकांचे डोळे विस्फारले होते.त्यावेळी ‘हा’ ज्योतिषी कोण ? अशी चर्चा रंगली असताना..’तो ‘ हाच तर ज्योतिषी नाही ना ? अशी चर्चा जोर धरत आहे.
राज्यातील न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रलंबित झालेल्या व राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार,जिल्ह्यातील प्रलंबित राहिलेल्या तीन नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी शनिवार दि.२० डिसेंबर 2025 रोजी मतदान मोठ्या उत्साहात संपन्न झाले होते तर त्याची 21 डिसेंबर रोजी मतमोजणी संपन्न झाली होती.त्यात कोल्हे गटाला नगराध्यक्षपद कडाकाठावर तर पाच अन्य उमेदवारांना बरोबर घेऊन त्यांचे बहुमत 19 वर गेले होते.तर आ.काळे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे यांचा अवघा 400 मतांनी पराभव झाला होता.आ.काळे गटाला 07 वरून 11 वर गेल्या असल्याचे दिसून आले होते.या निवडणुकीत आ.आशुतोष काळे गटाकडून त्यावेळी कृष्णाई मंगल कार्यालयात एका अचानक क्षणीं राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी आ.आशुतोष काळे गटात प्रवेश करून राजकीय वर्तुळात मोठा भूकंप घडवला होता.आणि त्यांचे विजयाचे मेरिट होते हेही नक्की झाले होते.मात्र कोल्हे गटाने त्यांना न्यायालयीन प्रक्रियेत गुंतवून मिळालेल्या वेळात आपला प्रचार बळकट करून विजयाचे गणित बिघडून टाकले होते.त्यावेळी कोयटे यांनी आ.आशुतोष काळे गटात प्रवेश करून त्या वेळी त्यांनी आपल्या पहिल्यावहिल्या भाषणात आपल्याला,” एका प्रसिद्ध ज्योतिषाने आपल्या राजकीय आयुष्यात ही चाळीस वर्षांनी होणारी निवडणूक लढविण्याचा सल्ला दिला असून आपण यात विजयी होणार असल्याची भविष्यवाणी (बतावणी) केली होती.त्यावेळी अनेकांचे डोळे विस्फारले होते.त्यावेळी हा ज्योतिषी कोण ? असा सवाल निर्माण झाला होता.मात्र तो सवाल गुलदस्त्यातच राहिला होता.

कोपरगाव तालुक्यात एरव्ही विरोधकांची दुखरी नस कळताच एकमेकावर तुटून पडणारे नेते आता बिल्ली मांजर होऊन बिळात जाऊन बसले असल्याचे दिसून येत आहे.यावेळी कोयटे यांचे चलचित्रण पाहून ही मंडळी त्यांचेवर तुटून पडली असती मात्र यावेळी मात्र त्यांचा अपवाद होताना दिसून येत आहे.यामागे आपलेच काय होणार ? ही साधार चिंता या नेत्यांना सतावत असल्याने,” पिराचेच पिराला पडले,फकिराचा कोण विचार करणार” बहुधा हा विचार असावा.अन्यथा कोणी विरोधक यात गवसला असता तर त्यावर ही मंडळी किती तुटून पडली असती हे सांगण्यास कोणा अशोक भोंदूची गरज नाही.
दरम्यान आता मागील महिन्यात भोंदू ज्योतिषी अशोक खरात याला अटक झाल्यानंतर तो कोणाकोणाचा गुरु आहे ? आणि त्याचे चेले कोणकोण आहे ? हे हळूहळू उघड होत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे भोंदू खरात याचे कारनामे आणि लीला पाहून अनेकांचे धाबे दणाणले आहे.कोपरगाव शहर आणि तालुक्यात शिर्डी बरोबरच या भोंदू बाबाचा मोठा परिवार असल्याची माहिती हाती आली आहे.त्यात अनेक नेते मंडळी असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.मात्र अद्याप पुरावे हाती आलेले नाही.त्यामुळे अनेकांनी आता आपला बचाव सुरू केला आहे.त्यातच काही नेते मंडळींना काही कार्यकर्त्यांनी या भोंदूबाबत काही सवाल उपस्थित केलाच तर ही नेते मंडळी,”जाऊ द्या बुवा”द्या सोडून विषय तुम्ही फार त्या बाबाच्या मागे लागता राव” असे सांगून हे प्रकरण आपल्यावर शेकायला नको याची काळजी घेताना दिसत आहे.एरव्ही एकमेकावर तुटून पडणारे नेते आता बिल्ली मांजर होऊन बिळात जाऊन बसले असल्याचे दिसून येत आहे.यावेळी कोयटे यांचे चलचित्रण पाहून ही मंडळी त्यांचेवर तुटून पडली असती मात्र यावेळी मात्र त्यांचा अपवाद होताना दिसून येत आहे.यामागे आपलेच काय होणार ही साधार चिंता या नेत्यांना सतावत असल्याने,” पिराचेच पिराला पडले,फकिराचा कोण विचार करणार” बहुधा हा विचार असावा.अन्यथा कोणी विरोधक यात गवसला असता तर त्यावर ही मंडळी किती तुटून पडली असती हे सांगण्यास कोणा भोंदूची गरज नाही.मात्र यावेळी कसा ऐन कडक उन्हाळ्यात कोपरगाव शहर आणि तालुक्यात,’कुलकुल ‘ वातावरण तयार झाले असल्याचा भास होत आहे.यातील काही नेत्याने आणि त्यांच्या चेल्यानी हा भोंदूला आपल्या घरी चार चार दिवस पूजा विधीच्या नावाखाली गुपचूप आणून आपला कार्यभाग साधला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.मात्र आता जो तो,”आपण नाही त्यातली”आणि ….! ची भूमिका घेताना दिसून येत आहे.त्यातच आज सकाळपासून समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांचे फोटो झळकताना दिसत आहे.त्यामुळे कोयटे यांचा ज्योतिषी हाच तर नव्हे अशी चर्चा गल्लोगल्लीत आणि चौकाचौकात होताना दिसत आहे.



