गुन्हे विषयक
कांदा व्यापाऱ्याची ४.१६ लाखांची फसवणूक,गुन्हा दाखल नाही !

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर हद्दीतील श्री.बालाजी ट्रेडर्स नावाच्या एका कांदा व्यापाऱ्याने चेन्नई येथील व्यापाऱ्याला आपला २५.७ टन ०४ लाख १६ हजार ८४० रुपयांचा कांदा आंध्र प्रदेशातील ट्रकने (क्रमांक एम.एच.२५ ए.जे.३०३४) हि ओम ट्रान्सपोर्ट,शॉप नं. ७४ मर्केट यार्ड,नेवासा रोड,श्रीरामपूर यांचे मार्फत पाठवला असता ट्रॅक चालक आणि मालकाने तो अन्य व्यापाऱ्याला परस्पर विकून टाकला असून ती रक्कम संजय वांढेकर नावाच्या ठगाने परस्पर लांबवली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.त्यामुळे तक्रारदाराने या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहरात दुचाकी आणि चारचाकी चोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.त्यातच निवारा परिसरात दुचाकी चोरांनी हैदोस घातला असल्याच्या बातम्या सामाजिक संकेतस्थळावर धुमाकूळ घालत आहे.सी.सी.टी.व्ही.मध्ये सुमारे ०३ चोरटे असल्याच्या चर्चा होत आहे.त्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

इराण आणि अमेरिका,इस्रायल युद्धाचे परिणाम आता जगभर दिसू लागले आहे.त्याला आपले राज्य महाराष्ट्र अपवाद नाही.विशेषतः नाशिक,नगर जिल्ह्यातील आणि सोलापूर बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर प्रचंड कोसळले असून ते प्रति किलो ₹७ ते ₹११ (घाऊक) वर आले आहेत.निर्यातीवरील अनिश्चितता,जागतिक बाजारपेठेतील मागणी घटणे,आणि अतिरिक्त आवक यामुळे भावात मोठी घसरण झाली आहे.या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.त्यातच,’घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे’ अशी स्थिती संवत्सर येथील व्यापाऱ्याच्या वाट्याला आली असल्याचे दिसून येत आहे.याबाबत कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात एक लेखी तक्रार दाखल झाली असून मात्र वर्षे उलटूनही गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले नाही.त्यात संवत्सर येथील बालाजी ट्रेडर्स या व्यापारी आडत फॉर्मचे मालक रंजना पोपटराव झुरळे,पोपटराव दौलतराव झुरळे,दोघे रा.मातोश्रीनगर,जेऊरपाटोदा यांनी आपला २५ टन ७४० किलो कांदा दिलेल्या ऑर्डरनुसार हा चेन्नई येथील व्यापारी फर्म चैन्नई येथील व्यापारी विजीयराज धनकराम उर्फ मनी यांनी बालाजी ट्रेडर्स,ई -९२,पेरियार,व्हेजिटेबल मर्केट,कोयंबेडू,चेन्नई यांना नेहमीच्या विश्वासाने दाऊद जामदार यांचे ओम ट्रान्सपोर्ट,शॉप नं.७४ मर्केट यार्ड,नेवासा रोड,श्रीरामपूर यांचे वजन करून वरील ट्रकच्या सहाय्याने व मार्फत पाठवला होता.मात्र तो माल ज्या वरील फर्मला पाठवला त्यांना न मिळता तो ट्रकचालकाने तो भलतीकडेच म्हणजेच चैन्नई येथील एम.पी.आर आंनियर ट्रेडर्स के.१०२,या दुकानात खाली उतरून दिला होता.त्यावेळी कांदा पाठवणारे व्यापारी झुरळे यांनी त्याबाबत सदर व्यापाऱ्याला विचारणा केली असता त्यांनी असा कोणताही कांदा आम्हाला मिळाला नाही असे सांगितल्यावर झुरळे यांची बोबडी न वळली तर नवल होते.त्यांनी याबाबत संबंधित ट्रकचालक या फोन केला असता तो बंद असल्याचे आढळून आले होते.त्यांनी याबाबतची चेन्नई येथे जाऊन अधिकची माहिती काढली असता तो कांदा आणि कांद्याचे बिल संजय वांढेकर रा तिसगाव,ता.पाथर्डी याने परस्पर काढून घेतले असल्याचे धक्कादायक माहिती उघड झाली आहे.त्याने त्यासाठी आपण आपली बिल्टी घातली असल्याचे आश्चर्यकारक दावा केला आहे.त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने प्रकरणी अभ्यास केला असता ती गडबड नाव साधर्म्यामुळे झाली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी माझ्याकडे अर्जदाराला लगेच पाठवा मी कारवाई करण्यास तयार आहे.उशिराने मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी या प्रकरणी माहिती घेतली असता सदर अर्ज शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे पाठवला असल्याची माहिती दिली असून त्यांनी हिरवा झेंडा दाखविल्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान या घटनेने गडबडून जाऊन त्यांनी तातडीने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत दिनाक ३१ मार्च २०२५ रोजी लेखी तक्रार दाखल केली असल्याची माहिती आहे.त्याच्या प्रति पोलिस अधीक्षक अहिल्यानगर,शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती आदींना पाठवल्या आहेत.मात्र अवर्षे उलटूनही त्यांना न्याय मिळाला नसल्याचा आरोप रंजना झुरळे व पोपटराव झुरळे यांचा आणि त्यांचे वकील ऍड.जोशी यांनी केला आहे.त्यामुळे ही मंडळी हवालदिल झाली आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कोपरगाव शहरात चोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.त्यातच निवारा परिसरात दुचाकी चोरांनी हैदोस घातला असल्याच्या बातम्या सामाजिक संकेतस्थळावर धुमाकूळ घालत आहे.त्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान दुसऱ्या घटनेत काल रात्री कोपरगाव शहरातील निवारा परिसरात हातात कत्ती घेऊन दहशत करणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून .त्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी दहशत करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करावे अशी मागणी प्रभाग क्रमांक ०३ मधील नगरसेवक जनार्दन कदम व सेनेचे माजी शहराध्यक्ष कलविंदर दडियाल यांनी केली आहे.



