जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

… ‘ त्या घटनेने ग्रामस्थ हादरले,ग्रामसभा संपन्न !

न्यूजसेवा

संवत्सर-(शिवाजी गायकवाड)

   संवत्सर परिसरातील घटना दुर्दैवी असून आगामी काळात काही विपरीत घडल्यास संवत्सर आणि परिसरातील ग्रामस्थानी आम्हाला संपर्क करून माहिती द्यावी त्यामुळे गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल असे आवाहन कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी नुकतेच संवत्सर येथील एका बैठकीत केले आहे.

कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना.

“संवत्सर गावाला शके संवत्सरेचा प्राचीन वारसा असून या गावात सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने राहतात.अनेक वर्षापासून गावात कोणतेही मतभेद नाही.मात्र या हद्दीत एका तरुणाचा झालेला खून म्हणजे गावाला लागलेला एक कलंक आहे.व गावातील सर्वांनी मिळून अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांना बंदोबस्त करणे ही काळाची गरज बनली आहे”-राजेश परजणे,अध्यक्ष,गोदावरी परजणे तालुका सहकारी दूध संघ.

   कोपरगाव तालुक्यातील संवत्सर हद्दीतल रामवाडी येथील आरोपींच्या बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून रामवाडी संवत्सर येथील आरोपी करण सुदाम मोरे,संजय सुदाम मोरे,समाधान कचरु पोटे व वारी येथील आरोपी रोहीत दयानंद पवार आदींनी कट रचुन व संगनमत करून फिर्यादीचा भाऊ नवनाथ माधव कानकाटे यास हनुमान मंदीराजवळ बोलावुन घेतले व त्यास लोखंडी कत्ती,विटांनी व दगडांनी हाताला,डोक्याला मारुन त्याचा रात्री 09 वाजेच्या सुमारास खुन केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती.तया चारही आरोपींना ०६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती प्राप्त झाली असताना यात आरोपींनी बनाव केला असल्याची माहिती समोर आली आहे.या पार्श्वभूमीवर आज सकाळी संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत शनी मंदिर परिसरात आज पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी ग्रामस्थाना विश्वासात घेण्यासाठी व वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन केले होते.त्यावेळी ते बोलत होते.

  सदर प्रसंगी गोदावरी परजणे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,ग्रामपंचायत उपसरपंच विवेक परजणे,पोलिस उपनिरीक्षक संदीप सोन्ने,चंद्रकांत लोखंडे,लक्ष्मण साबळे,दिलीप ढेपले,लक्ष्मण परजणे,सोमनाथ निरगुडे,खंडू फेपाळे,भरत बोरणारे,श्री शिंदे,रावसाहेब निलक,विजय परजणे,अनिल बंडू आचारी,बाळासाहेब दहे,ग्रामपंचायत अधिकारी कृष्णा अहिरे,ज्ञानेश्वर कासार, बाळासाहेब भोसले,बाळासाहेब गायकवाड,बाळासाहेब भोसले,मधुकर शेटे,हबीब तांबोळी,आयुब पठाण,भाऊराव गायकवाड आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

  सदर प्रसंगी राजेश परजणे यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की,”संवत्सर गावाला शके संवत्सरेसारखा प्राचीन वारसा असून या गावात सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने राहतात अनेक वर्षापासून गावात कोणतीही मतभेद नसून हा झालेला खून म्हणजे गावाला लागलेला एक कलंक असल्याचा दावा केला आहे. व गावातील सर्वांनी मिळून अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांना बंदोबस्त करणे ही काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन केले आहे.गावात जे अवैध धंदे चालतात ते तपासण्याची जबाबदारी प्रशासनाची पोलिसांची आहे.नुकताच खुनाचा झालेला प्रकार निंदनीय आहे तरी रामवाडी परिसरातील लोकांनी स्पष्टपणे सांगावे असे आवाहन केले आहे.

   दरम्यान यावेळी अनेक महिलांनी खून झालेल्या तरुणाबद्दल चांगले उद्गार काढले असल्याची माहिती आहे.त्याचबरोबर ज्या आरोपींनी मयताचा खून केला ते दररोज मारणाऱ्या भांडणे दारू नशेत करतात शाळेतील मुला मुलींना त्यामुळे भीती वाटते कालच्या प्रकारामुळे त्या परिसरात राहणारे लोक घाबरून गेले असल्याचे प्रतिपादन केले आहे.

   यावेळी राष्ट्रवादीचे शिवाजी ठाकरे,पांडूरंग शिंदे,ज्ञानेश्वर परजणे,दिलीप बोलणारे,शैलेश नीलक त्या मयत मुलाची बहीण मयत मुलाची आई सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केली असून त्यांनी अपदग्रस्त कुटुंबाबरोबर असल्याचे सांगून सदर कुटुंबास दिलासा दिला आहे.

   यावेळी पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी शेवटी,संवत्सर आणि पोलिस ठाण्याचे हद्दीत काही विपरीत घटना आढळून आल्यावर ग्रामस्थानी आम्हाला फोन करावा अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांना आम्ही जवळ करणार नाही.त्यांच्यावर जास्तीत जास्त कलम लावून त्यांना जास्तीत जास्त सजा होईल तरी  लोकांनी घाबरून न जाता समोर यावे पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close