जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

पुन्हा एका महसुली कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक ?

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    कोपरगाव तहसील कार्यालयात न्यायालयाचे आदेशाने वारसांची नोंद करण्यासाठी अर्जदाराकडून तब्बल ०७ हजार रुपयांची साक्षीदारांसमोर लाच घेताना अटक केलेल्या महसूल सहाय्यक अंजना पंडीत पवार हिला आधी न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असताना आज संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक या ठिकाणी एक बाळासाहेब बोऱ्हाडे या तलाठ्याला कुणबी जातीचा दाखला देण्यासाठी 06 हजारांची लाच घेताना आज दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास अटक केली असल्याची धक्कादायक माहिती  हाती आली आहे.त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक अंजना पंडीत पवार हिला रंगेहात अटक केली होती.त्यानंतर या कारवाई करण्यास ओहटी लागेल हा अंदाज सपशेल फसला आहे.त्यानंतर जिल्हाधिकारी यांचा उत्तर  नगर जिल्हा दौरा झाला होता.त्यांनी अशा कर्मचाऱ्यांना दणका देण्यासाठी थेट लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधवण्याचे आवाहन केले होते.त्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी लाच घेताना थोडी तरी लाज बाळगतील अशी आशा सपशेल फोल ठरली आहे.त्यामुळे महसूल विभाग टीकेचा धनी झाला आहे.

  भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा,१९८८ हा भारतातील सरकारी संस्थांमधील लाचखोरी व भ्रष्टाचार रोखणारा प्रमुख केंद्रीय कायदा आहे.या कायद्यानुसार लाच मागणे किंवा स्वीकारणे यांसाठी ३ ते ७ वर्षांची सक्तमजुरी आणि दंडाची तरतूद आहे.हा कायदा लोकसेवकाकडून होणाऱ्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करतो. असे असताना सरकारी बाबू आणि अधिकारी लाच घेताना काही कमी होताना दिसतं नाही.कोपरगाव तालुक्यात डझनभर अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई झाली आहे.गत सप्ताहात कोपरगाव तहसील कार्यालयातील महसूल महिला कर्मचारी हिने न्यायालयाचे आदेशाने वारसांची नोंद करण्यासाठी अर्जदाराकडून तब्बल ०७ हजार रुपयांची साक्षीदारांसमोर लाच घेताना अटक केलेल्या महसूल सहाय्यक अंजना पंडीत पवार हिला रंगेहात अटक केली होती.त्यानंतर या कारवाई करण्यास ओहटी लागेल हा अंदाज सपशेल फसला आहे.त्यानंतर जिल्हाधिकारी यांचा उत्तर  नगर जिल्हा दौरा झाला होता.त्यांनी अशा कर्मचाऱ्यांना दणका देण्यासाठी थेट लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधवण्याचे आवाहन केले होते.त्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी लाच घेताना थोडी तरी लाज बाळगतील अशी आशा सपशेल फोल ठरली आहे.आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तोंडी लागलेली लाचेची सवय कमी होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही असे दिसत असल्याने समाजात चिंता व्यक्त होत आहे.

   दरम्यान अशीच घटना आज उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक या ठिकाणी सेवेत असलेला तलाठी याचवेर लाचलुचपत विभाग नगर येथील उपअधीक्षक अजय तिरपुडे यांनी कारवाई केली असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्याने कुणबी जातीचे प्रमाणपत्र बनवून देण्यासाठी ही लाच घेतली असल्याचे दिसून आले आहे.त्याने आधी या कामासाठी 13  हजार रुपयांची लाच मागितली होती.तडजोड करून ती शेवटी 06 हजार ठरविण्यात आली असल्याची माहिती हाती आली आहे.ही घटना संगमनेर शहरातील सागर कॅफे जवळ घडली आहे.ते ठिकाणी तालुक्यातील सर्व तलाठी मंडळींचा बसण्याचा ठेपा असल्याची माहिती आहे.त्याच ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे.

  दरम्यान या कारवाईत अहिल्यानगर येथील लाच लुचपत विभागाचे उपअधीक्षक अजय तिरपुडे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रमुख भूमिका निभावली आहे.त्यांचे संगमनेर सह नगर जिल्ह्यातील नागरिकांनी जोरदार स्वागत केले आहे.अद्याप पंचनामा करून कारवाई सुरू आहे.आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close