गुन्हे विषयक
…या गावात ६५ हजारांची चोरी,गुन्हा दाखल !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील आ.आशुतोष काळे यांचे गाव असलेल्या माहेगाव देशमुख येथील फिर्यादी विजयराव डागुजी मोहिते (वय-८२) यांच्या घराचे काम सुरू असताना अज्ञात चोरट्यांनी दिवसा ढवळ्या त्यांच्या स्वयंपाक घराचे विविध सामानासह ६५ हजारांच्या विविध चीजवस्तूंचा पोबारा केला असल्याचे उघडकीस आले आहे.त्यामुळे ग्रामस्थांत भीतीने वातावरण निर्माण झाले आहे.

कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांचे गाव असलेल्या माहेगाव देशमुखात चोरट्यांनी आपली विशेष चौर्य लीला दाखवली आहे.त्याच गावातील इसम विजयराव मोहिते यांचे घराचे काम सुरू असताना त्यांनी आपल्या स्वयंपाक घरातील कामासाठी ६५ हजारांचे विविध साहित्य आणले होते.त्यावर डल्ला मारला आहे.
कोपरगाव तालुक्यात चोरट्यांची विविध लीला नागरिकांना परिचित आहे.पण तालुक्यात वाळूचोरी पुन्हा एकदा डोके वर काढू लागली आहे.शिवाय अन्य अवैध व्यवसायांना पूर आला आहे.त्याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.आ.आशुतोष काळे यांनी आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे याची गंभीर तक्रार केली आहे.त्यातच आणखी एका गुन्ह्याची भर पडली आहे.कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांचे गाव असलेल्या माहेगाव देशमुखात चोरट्यांनी आपली विशेष चौर्य लीला दाखवली आहे.त्याच गावातील इसम विजयराव मोहिते यांचे घराचे काम सुरू असताना त्यांनी आपल्या स्वयंपाक घरातील कामासाठी विविध साहित्य आणले होते.त्यावर वाकडी नजर असलेल्या चोरट्यांनी आपली,”हात की चलाखी” दाखवली आहे,त्या ठिकाणी असलेले जग्वार कंपनीचे ०४ मिक्सर कॉक,वॉश बेसिन चे फ्लँकचे चार कॉक,वेस्टन कमांडोचे ०४ ब्रास कोटेड कॉक,स्टिलचे ०२ किचन कॉक,०२ बेसिनचे खालचे बाजूस असलेले ब्रॉसचे स्टील कोटेड कॉक आदी एकूण ६५ हजारांच्या ऐवज लंपास केला आहे.त्यांनी एक प्रकारे लोकप्रतिनिधींना आव्हान दिले असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी माळेगांव थडी येथील दोन संशयित इसम चंद्रकांत गाडे,सागर गवळी आदींवर गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी,पोलिस हेड कॉन्स्टेबल एस. ए.कुडके आदींनी भेट दिली आहे.
दरम्यान कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रं.१९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे दोन चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरिक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉन्स्टेबल कुडके हे करीत आहेत.



