गुन्हे विषयक
…या पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक आठवड्यात सात मुली गायब !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
मागील काही दिवसांपासून राज्यांतील बेपत्ता व्यक्तींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या बातम्यांची संख्या वाढलेली दिसतेय.खरेतर ही वाढ केवळ राज्य पातळीवर नसून देश,जागतिक पातळीवरही दिसते आहे.ही वाढ मागील काही दशकांच्या तुलनेत अधिक आहे.कोपरगाव तालुका त्याला अपवाद नसून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका सप्ताहात 05 अल्पवयीनसह जवळपास 07 मुली गायब झाल्या असून शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वर्षभरात 16 मुली गायब झाल्या असल्याची चिंताजनक माहिती उपलब्ध झाली आहे.

“पालकांनी मोबाईल वरील सामाजिक संकेतस्थळे,अश्लील चित्रपट,ओ.टी.टी.मसाला,खाजगी आणि दूरदर्शन आदिवरील मालिकांचा हा प्रभाव असून पालकांनी आपल्या मुली आणि पाल्यांची आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे.उमलत्या वयात त्यांच्या संशयास्पद हालचाली वर लक्ष ठेवण्याची गरज आहे”-संदीप कोळी,पोलिस निरीक्षक,कोपरगाव तालुका पोलिस ठाणे.
महाराष्ट्रात,देशांत मुलं-मुली बेपत्ता होण्यामागे विविध कारणे आहेत.मानवी तस्करी,बालविवाह,पळून जाणे,लैंगिक शोषण,कामासाठी शोषण,आणि कौटुंबिक समस्या, प्रेमसंबंध किंवा सामाजिक माध्यमांवरील फसवणूक इत्यादींचा समावेश होतो; यांतील काही घटनांमध्ये कधी फसवून नेले जाते तर कधी मुलं-मुली स्वतःच काही कारणास्तव घर सोडून जातात,आणि अनेकदा पोलिसांत तक्रार दाखल होण्यास उशीर होतो किंवा प्रतिष्ठेचा विषय समजून प्रकरणे दाबून टाकली जातात,ज्यामुळे ही समस्या गंभीर बनते.कोपरगाव शहर आणि तालुक्यात मागी दिवसात,’लव जिहाद’ चे प्रकरण गाजले होते.त्यातून कोपरगाव तालुक्यात मोठा मोर्चा निघाला होता.महिन्याकाठी कोपरगाव तालुक्यात जवळपास 25-26 मुली विविध कारणाने गायब होत आहे.त्यामुळे पालक वर्गात चिंता वाढत आहे.याबाबत विविध शाळा महाविद्यालये आदींमध्ये याबाबत जनजागृती करणे गरजेचे बनले आहे.

दरम्यान कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 01 जानेवारी ते 31 डिस्नेंबर 2025 या एक वर्षाच्या काळात कालखंडात जवळपास 3 मुलांसह 16 अल्पवयीन मुली बेपत्ता झाली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.मात्र यात ‘लव जिहाद’ बाबत आकडेवाडी उपलब्ध झाली नाही.
दरम्यान मागील सप्ताहात तर कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीस शाळेतून घरी सोडण्याच्या बहाण्याने अनोळखी तरुणाने घरात प्रवेश मिळवून तिच्यावर अंती प्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.मात्र मुलीने वेळीच सावधपणा दाखवून त्याला प्रतिकार केलाच पण त्याच सोबत आरडाओरडा केल्याने नजिकच्या ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतल्याने त्याने घटनास्थळावरून पोबारा केला आहे.त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,पोलिस उपनिरीक्षक संदीप सोन्ने यांनी भेट दिली असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.
*पत्रकार नानासाहेब जवरे* यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी *’न्यूजसेवा‘* वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा.
https://bit.ly/newsseva2025
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”पालकांनी मोबाईल वरील सामाजिक संकेतस्थळे,अश्लील चित्रपट,ओ.टी.टी.मसाला,खाजगी आणि दूरदर्शन आदिवरील मालिकांचा हा प्रभाव असून पालकांनी आपल्या मुली आणि पाल्यांची आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे.उमलत्या वयात त्यांच्या संशयास्पद हालचाली वर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.



