जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव नजीक एकाचा मृत्यू,खून की आत्महत्या !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत मनाई वस्ती नारदी नदीच्या कडेला एक पुरुष जातीचे प्रेत कुजलेल्या स्थितीत आढळून आले असल्याचे खळबळ उडाली आहे.हा खून आहे की आत्महत्या याबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.याबाबत संवत्सर येथील पोलिस पाटील लीना विकास आचारी (वय-43) यांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.यामुळे संवत्सर,शिंगणापूर शिवारात खळबळ उडाली आहे.

  

कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत संवत्सर शिवारात मनाई वस्ती या ठिकाणी नारदी नदीच्या कडेला एक पुरुष जातीचे प्रेत आढळून आले आहे.त्यामुळे हा खून आहे की आत्महत्या याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

   कोपरगाव नगरपरिषद निवडणूक नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.याकाळात पोलिस यंत्रणेवर मोठा ताण आला होता.अधिकारी आणि पोलिस कर्मचारी यांना गेली महिनाभर अतिरिक्त कामाचा ताण पडला असल्याचे लक्षात आले आहे.याच दरम्यान कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत संवत्सर शिवारात मनाई वस्ती या ठिकाणी नारदी नदीच्या कडेला एक पुरुष जातीचे प्रेत आढळून आले आहे.त्यामुळे हा खून आहे की आत्महत्या याबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.मनाई वस्ती आणि संवत्सर शिवारात रेल्वे रुळाच्या कडेला वारंवार अशी घटना आढळून येत आहे.याबाबतची माहिती काही नागरिकांनी तेथील पोलिस पाटील लीना आचारी यांना कळवली होती.त्यांनी  याबाबत कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना कळवली होती.त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन सदर घटनेचा पंचनामा केला असून पुढील कारवाई साठी सदर शव संवत्सर येथील जिल्हा परिषद रुग्णालयात रवाना केले आहे.

    दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,पोलिस उपनिरीक्षक सोन्ने आदींनी भेट दिली असून आरोपी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

   दरम्यान कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रं.86/२०२५ भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम १94 प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास शहर पोलिस निरिक्षक कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस हे.कॉन्स्टेबल जालिंदर तमनर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close