जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

एकास ठार मारण्याचा प्रयत्न,चार जणांवर गुन्हा!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरानजीक असलेल्या या शिंगणापूर येथील उद्योगिक वसाहतीत बर्फाच्या कारखान्यात बर्फ आणण्यासाठी गेलेले खाटिक गल्ली येथील फिर्यादी इसम इफान मुस्ताक कुरेशी (वय-२६) यांच्यासह अन्य दोन जणांवर आरोपी डोमा बिंदीलाल सरदार व अन्य तीन जणांनी हातोडा,कात्री,टोचा आदी धारदार शस्त्राने वार करून रक्तबंबाळ केल्याने या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्यादीने गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव शहर आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

  

सामाजिक संकेतस्थळावर प्रसिद्ध चलचित्रणात या दुर्दैवी घटनेत फिर्यादी अफाण कुरेशी दिसत आहे.

फिर्यादी अफान कुरेशी याचा खाटकाचा व्यवसाय असून आपले मांस सुरक्षित रहावे यासाठी सदर इसम औद्योगिक वसाहतीत बर्फाच्या कारखान्यात बर्फ आणण्यासाठी गेला होता.त्यावेळी आरोपी डोमा बिंदीलाल,कार्तिककुमार सोनी सरकार,आशिषकुमार डोमी सरदार,राहुल कुमार डोमी सरदार आदी चार जणांनी त्याच्यावर हातात असलेली कात्री,धारदार टोचा,जड हातोडा आदींच्या साह्याने जोरदार हल्ला चढवला असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

   

सदर घटनेत आणखी एक जखमी दिसत असून तो कोण आहे हे समजले नाही.गुन्ह्यात त्याचा उल्लेख दिसत नाही.

  याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,समाजाची अलीकडील काळात सहनशीलता संपत चालली असून किरकोळ कारणावरून माणसे एकमेकांच्या जीवावर उठताना दिसत आहे.अशीच घटना काल रात्री शिंगणापूर शिवारात रात्री ०९ वाजेच्या सुमारास औद्योगिक वसाहतीत घडली असून फिर्यादी अफान कुरेशी याचा खाटकाचा व्यवसाय असून आपले मांस सुरक्षित रहावे यासाठी सदर इसम औद्योगिक वसाहतीत बर्फाच्या कारखान्यात बर्फ आणण्यासाठी गेला होता.त्यावेळी आरोपी डोमा बिंदीलाल,कार्तिककुमार सोनी सरकार,आशिषकुमार डोमी सरदार,राहुल कुमार डोमी सरदार आदी चार जणांनी त्याच्यावर हातात असलेली कात्री,धारदार टोचा,जड हातोडा आदींच्या साह्याने जोरदार हल्ला चढवला असून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.त्यात ते गंभीर जखमी केले असल्याचे आपल्या दाखल गुन्ह्यात म्हटले आहे.या घटनेत आणखी दोन जण जखमी असून त्यांचे नावे समजली नाही.

  दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,पोलिस निरीक्षक दीपक रोठे आदींनी भेट दिली असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे आरोपी परप्रांतीय म्हणजेच बिहारी असल्याची माहिती हाती आली आहे.

   दरम्यान कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रं.५९९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९,११८(२),(१),११५(२),३५२,३५१(२),३,(५)) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास शहर पोलिस निरिक्षक कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप सोन्ने हे करीत आहेत.
आपण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close