गुन्हे विषयक
लोखंडी पाईपने मारहाण,तीन जण जखमी,गुन्हा दाखल !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील घारी शिवारात शेतात जाण्याचा रस्ता उत्खननाच्या सहाय्याने करण्याच्या कारणावरून काल दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास दोन गटात लोखंडी पाईपच्या सहाय्यानं मारहाण होऊन त्यात समरीन अल्ताफ पठाण,कमरूनिसा आयुब पठाण व अल्ताफ आयुब पठाण आदी तीन जण गंभीर जखमी झाले असल्याचे गुन्हा फिर्यादी अल्ताफ आयुब पठाण (वय-28) रा.घारी यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात आरोपी जाकीर हसन जमाल पठाण याचे विरुध्द दाखल केला आहे.

“आपण कायदेशिररित्या रस्ता मोकळा करण्याकरीता उत्खनक घेवुन जात असतांना रस्त्यावर घारी शिवार येथे जे.सी.बी.आडवुन आपल्याला आरोपींने दम दिला की,”जे.सी.बी.घेवुन जायचा नाही,तुम्ही रस्ता खुला करयाचा नाही,नाहीतर तुझा जेसीबी मी पेटुन देईल”असे म्हणून आरोपी जाकीर पठाण व यांने आपल्याला त्याचे हातातील लोखंडी पाईपने मारहाण केली असून त्यात तीन जण जखमी केले आहे.
राज्य सरकारने शेत पाणंद रस्ते करण्याचा व शेताची मोजणी नाममात्र निधीत करण्याचा निर्णय नुकताच घेतला असला तरी या पूर्वी याबाबत राज्यात शेत बांधाच्या कारणावरून हाणामाऱ्या ही नेहमीची घटना होती यात अनेक गुन्हे दाखल होऊन अनेक जण जीवाला मुकत होते तर अनेक जण जखमी होत होते.यातून सरकारने बोध घेऊन मार्ग काढला असला तरी अद्याप शासन आदेश येईपर्यंत किती बळी जातील काही सांगता येणार नाही.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यातील घारी ग्रामपंचायत हद्दीत काल दुपारी 1.30 वाजता घडली असून यात फिर्यादी अल्ताफ पठाण यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”आपण कायदेशिर रित्या रस्ता मोकळा करण्याकरीता उत्खनक घेवुन जात असतांना रस्त्यावर घारी शिवार येथे जे.सी.बी.आडवुन आपल्याला आरोपींने दम दिला की,”जे.सी.बी.घेवुन जायचा नाही,तुम्ही रस्ता खुला करयाचा नाही,नाहीतर तुझा जेसीबी मी पेटुन देईल” असे म्हणून आरोपी जाकीर पठाण यांने आपल्याला त्याचे हातातील लोखंडी पाईपने आपली आई कमरुनिसा हिंला मारहाण केली.तसेच फिर्यादीची पत्नी समरीन हिला देखील ती गर्भवती आहे हे माहित असतांना देखील तिला ओढताण करुन खाली जमीनीवर पाडले व दुखापत पोहचवली.त्याच प्रमाणे आरोपीत मजकुर याने त्याचे हातातील लोखंडी पाईपने आपले डोक्यावर जिवे मारण्याच्या उददेशाने गंभीर वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा आपल्या फिर्यादीत केला आहे.

दरम्यान घटनास्थळी शिर्डी पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल भारती,कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी.पोलिस उपनिरीक्षक वैशाली मुकणे यांनी भेट दिली आहे.जखमींना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात फिर्यादीने गुन्हा क्रं.3४0/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम 109,११८(१),११५(२),126(२),252,३५१(२)) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरिक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वैशाली मुकणे या हे करीत आहेत.



