गुन्हे विषयक

…या तालुक्यात वाळू चोरांचा हैदोस !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

    कोपरगाव तालुक्यातील महसूल आणि पोलिस अधिकारी कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत गुंतले असताना कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे गोदावरी नदीत वाळू चोरांचा हैदोस सुरू असून त्यांनी महसूल अधिकारी आणि पोलिसांना वाकुल्या दाखवण्यास सुरुवात केली असल्याने दिसून आले आहे.याबाबत आता या वाळू चोरांच्या विरूध्द कोण कारवाई करणार असा सवाल निर्माण झाला आहे.

कोळगाव थडी येथील वन जमिनीतील झाडांची झालेले कत्तल दिसत आहे.

मध्यंतरी विद्यमान लोकप्रतिनिधी यांचे स्वीय सहाय्यक या कामात माहीर समजले जात होते.परिणामी लोकप्रतिनिधींना त्यांची किंमत चुकवावी लागली असल्याचे बोलले जात आहे.आगामी निवडणुकांत त्यांचा चांगलाच फटका बसणार असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.

   कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीतून वाळू उपसा करण्यात जिल्हा प्रशासनाचे प्रतिबंध असतानाही वाळूचोर महसूल अधिकारी आणि पोलिसांना चकवा देऊन आपल्या लीला दाखवू लागले आहे.वाळूला सोन्याचे मोल मिळत असल्याचे सदरचे वाळू चोरटे कोणालाही जुमेनासे झाले आहे.त्यामुळे त्यांचेकडे अनेकवेळा गावठी कट्टे आढळून येत आहे.परिणामी महसूल अधिकाऱ्यांना मर्यादा येत असल्याचे दिसून येत आहे.वर्तमानात गोदावरी नदीतील साखळी बंधारे पाण्याने तुडूंब भरलेल्या स्थितीत आहे.तरीही वाळूचोर फरांड्याचा वापर करून वाळू नदी बाहेर काढून आपले उखळ पांढरे करताना दिसत आहे.

कोळगाव थडी येथे फरांड्याद्वारे होणारा वाळू उपसा दिसत आहे.

नजिक वन विभागाची जमीन असून त्या ठिकाणी हे वाळू चोर झाडांची मोठी कत्तल करून त्याठिकाणी आपले वाळूचे साठे दडवत असून त्याठिकाणी वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे वन,पोलिस आणि महसूल विभाग काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.याबाबत ग्रामस्थांतून मोठा संताप व्यक्त होत आहे.

      वर्तमानात तर त्यांना सुवर्ण संधी प्राप्त झाली असून निवडणुकांची पर्वणी साधण्यासाठी त्यांनी नामी संधी शोधली आहे.सर्व महसुली आणि पोलिस अधिकारी कोपरगाव नगरपरिषद निवडणुकांत गुंतले आहे.परिणामी त्यांना मोकाट रान मिळाले आहे.त्यामुळे त्यांनी फरांड्याच्या सहाय्याने वाळू नदीपात्रातून काढून आपले उखळ पांढरे करण्यात ते धन्यता मानत आहे.ते ग्रामपंचायत पदाधिकारी आणि महसुली अधिकाऱ्यांना जुमानत नाही हे अनेकवेळा दिसून आले आहे.नगरपरिषदा निवडणुका संपल्या की आगामी काळात लगेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा निवडणुका संपन्न होणार आहे.त्यामुळे आगामी काळ वाळू आणि गौण खनिज चोरट्यांना सुवर्ण संधी ठरणार आहे.त्यामुळे नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी कारवाई करणार का असा सवाल निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close