गुन्हे विषयक
गाडी फोडून 2.04 लाखांची दारू चोरी,गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील बालाजीअंगण या इमारतीसमोर उभ्या असलेल्या गाडीची ताडपत्री फाडून त्यातील देशी 180 मि.ली.65 सीलबंद बॉक्सच्या भिंगरी दारूच्या सीलबंद 03 हजार 120 बाटल्यांचे बॉक्स अंदाजे किंमत 02 लाख 04 हजार 360 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेले असल्याचा गंभीर गुन्हा गांधीनगर कोपरगाव येथील फिर्यादी चालक महेश बापूराव मोरे (वय -28 वर्षे) यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.

फिर्यादीने आपल्या ट्रक गाडीत मध्ये देशी दारू ‘भिंगरी’चे बॉक्स घेऊन जाणार होतो.मात्र रात्रीच्या सुमारास उशीर झाल्याने कोपरगाव शहरातील बालाजीअंगण या इमारतीत मुक्काम करून सकाळी जाणार असताना रात्री अज्ञात चोरट्याने गाडीवर पाळत ठेवून गाडीची ताडपत्री उचकटून त्यातील देशी दारूची चोरी करून पोबारा केला आहे.
कोपरगाव शहर आणि तालुक्यातील विविध ठिकाणी चोऱ्या वाढत चालल्या असून अनेक चोरटे चोऱ्या करून गायब होत आहे.त्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे.अशीच घटना दिनाक 08 ऑक्टोबर रोजी रात्री 08.45 वाजे नंतर तर सकाळी 06 वाजेपूर्वी घडली असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.त्यात फिर्यादी यांनी म्हंटले आहे की,”आपण गाडीचे चालक असून आपल्या ट्रक गाडीत (क्रं.एम.एच.41 जी.7135) मध्ये देशी दारू भिंगरी चे बॉक्स घेऊन जाणार होतो.मात्र रात्रीच्या सुमारास उशीर झाल्याने कोपरगाव शहरातील बालाजीअंगण या इमारतीत मुक्काम करून सकाळी जाणार असताना रात्री अज्ञात चोरट्याने गाडीवर पाळत ठेवून गाडीची ताडपत्री उचकटून त्यातील देशी 180 मि.ली.65 सीलबंद बॉक्सच्या भिंगरी दारूच्या सीलबंद 03 हजार 120 बाटल्यांचे बॉक्स अंदाजे किंमत 02 लाख 04 हजार 360 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेले असल्याचा गुन्हा गांधीनगर कोपरगाव येथील फिर्यादी चालक महेश बापूराव मोरे यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे शहर आणि तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान या प्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.पवार,पोलिस हेड कॉन्स्टेबल डी.एल.रोकडे आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.\2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 (क) प्रमाणे अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.काँ.डी.एल.रोकडे हे करीत आहेत.