गुन्हे विषयक
पती पत्नीची नदीत उडी,पती बेपत्ता,महिला बचावली

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या वायव्येस साधारण १५ कि.मी.अंतरावर आलेल्या मळेगाव थडी गावाच्या उत्तरेस रहिवासी असलेले जोडपे अण्णासाहेब केरू रणशूर व सखुबाई अण्णासाहेब रणशूर या जोडप्याने अज्ञात कारणाने गोदावरी पुलावरून उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला असून पत्नीचे दैव बलवत्तर म्हणून ती बचावली असून पती मात्र नदीच्या पुरात बेपत्ता झाला असून त्याचा कोपरगाव तालुका पोलिस शोध घेत आहे.या घटनेने मळेगांव थडी आणि परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

आपदग्रस्त जोडपे वंजारवाडी येथून ते आपल्या मूळ गावी आले होते.आपल्या कोळपेवाडी येथे कारखान्यात नोकरीस असलेल्या भावाच्या घरात ते राहत होते.त्यांच्यात काही बेबनाव असल्याची माहिती मिळत आहे.मात्र त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आत्महत्या हे जगभरातील मृत्यूचे १० वे प्रमुख कारण आहे,एकूण मृत्यूंपैकी अंदाजे १.५% आहे.दिलेल्या वर्षात,हे दर १ लाख लोकांमागे अंदाजे १२ आहे.जरी २०१५ मध्ये जगभरात आत्महत्यांमुळे ०८ लाख २८ हजार मृत्यू झाले,जे १९९० मध्ये ०७ लाख १२ हजार मृत्यूंपेक्षा वाढले असले तरी,वय-मानक मृत्युदर २३.३% ने कमी झाला.लिंगानुसार,महिलांपेक्षा पुरुषांमध्ये आत्महत्येचे प्रमाण सामान्यतः जास्त आहे,विकसनशील जगात १.५ पट जास्त ते विकसित जगात ३.५ पट जास्त आहे.डब्ल्यू.एच.ओ.चा अंदाज आहे की आत्महत्या करणाऱ्या लोकांपैकी २०% लोक कीटकनाशके किंवा बंदुक वापरून किंवा गळफास लावून घेतात.एखादी व्यक्ती स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न का करू शकते याची अनेक पूर्ण कारणे आहेत.त्यामध्ये मानसिक आरोग्य समस्या,जसे की नैराश्य,आणि इतर समस्या जसे की आर्थिक संकट,कौटुंबिक कलह,प्रिय व्यक्ती गमावणे आदींचा समावेश आहे.

कोपरगाव तालुक्यातील मळेगांव थडी येथे आज झालेल्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या घटनेतील जोडपे साधारण दहा वर्षापूर्वी उडी मारून बेपत्ता झालेला इसम अण्णासाहेब रणशुर हा आपल्या सासरवाडीस काम शोधण्याच्या निमित्ताने गेला होता.त्यानंतर त्यांना तीन भाऊ,एक मुलगा,एक मुलगी असे अपत्य आहे.त्यांची लग्ने झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली असून एक महिन्यापूर्वी मनमाड नाजिक पाच कि.मी.अंतरावर असलेल्या वंजारवाडी येथून ते आपल्या मूळ गावी आले होते.आपल्या कोळपेवाडी येथे कारखान्यात नोकरीस असलेल्या भावाच्या घरात ते राहत होते.त्यांच्यात काही बेबनाव असल्याची माहिती मिळत आहे.मात्र त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.तरीही त्यांच्याच काहीतरी कारणाने बेबनाव असल्याने त्यांनी गोदावरी नदीपात्रात धाव घेऊन त्यातील बेपत्ता इसमाने आपल्या पत्नीस आधी नदीत लोटून दिले असल्याचे काहींचे म्हणणे आहे.त्यानंतर त्याने स्वतः नदीच्या पूर पाण्यात आपले जीवन स्वाहा केले होते.मात्र पत्नी सखुबाई रणशुर हीचे दैव बलवत्तर म्हणून साडीत हवा घुसून ती सही सलामत पाण्यात तरंगुन आश्चर्यकारक रित्या बचावली असल्याचे समजते.तर नवरा अण्णासाहेब रणशुर हा मात्र पूर पाण्यात बेपत्ता झाला आहे.दरम्यान नदीकाठी असलेल्या काही लक्ष घटनास्थळाकडे गेल्याने त्यांनी तातडीने हालचाल करून पाण्याच्या प्रवाहात तरंगणाऱ्या महिलेस जीवदान दिले असल्याचे समजले आहे.त्यामुळे सदर महिलेच्या बाबतीत काळ आला होता पण वेळ आली नव्हती असा अनुभव उपस्थितांना आला आहे.त्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.ग्रामस्थात विविध तर्ककुतर्क सुरू आहे.अद्याप उशिरापर्यंत कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात याबाबत कोणतीही नोंद नव्हती.
दरम्यान या घटनेची माहिती कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांना मिळाल्याने त्यांचे सह त्यांचे सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बेपत्ता इसमाचा शोध सुरू केला आहे.मात्र त्यानंतर त्यांचा शोध लागला नसल्याची माहिती पोलिस निरीक्षक कोळी यांनी दिली आहे.