गुन्हे विषयक
मुलगी बेपत्ता,पित्याची पोलिस ठाण्यात धाव!

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत पश्चिमेस साधारण तीस किमी अंतरावर असलेल्या गावात आपली मुलगी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी पळवून नेली असल्याचा गुन्हा मुलीचा पित्याने (वय-३६) यांनी तालुका पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. त्यामुळे त्या परिसरात आणि तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत खळबळ उडाली आहे.

दिवसेंदिवस महिला व मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटना पोलीस प्रशासनासमोर एक आव्हान ठरत आहे. दररोज एक तरी महिला किंवा मुलगी बेपत्ता होत असल्याने हा गंभीर मुद्दा बनला आहे.अशीच एक घटना नुकतीच कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिनाक २९ ऑगस्ट रोजी उघड झाली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात गुन्हा अनुक्रमे नोंद २४० /२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७(२) प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध नोंद दाखल केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.संदीप बोटे हे करीत आहेत.
मागील काही वर्षापासून महिला तसेच मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या आहेत.यामुळे पालकांसह पोलीस प्रशासनाची चिंता वाढली आहे.विशेष म्हणजे अगदी तरुण व वयात आलेल्या मुली देखील घरी काहीच न बोलता अचानक बेपत्ता होत असल्याने पोलिसांना देखील त्यांचा तपास करतांना मोठी अडचण येत आहे.गत वर्षी नगर जिल्हाभरातून ७४ मुली तर यंदाच्या सहा महिन्यात ५४ मुली बेपत्ता झाल्याची पोलिस दत्परी नोंद करण्यात आली आहे.महिला,मुलींसह युवक,पुरुष बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत आहे.त्यांचा शोध घेण्यासाठी ठाण्यांमध्ये मिसिंग सेल सुरू करण्यात आले आहेत.तेथील अधिकारी, कर्मचारी मिसिंग व्यक्तीचा शोध घेण्याचे काम करतात.दिवसेंदिवस महिला व मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटना पोलीस प्रशासनासमोर एक आव्हान ठरत आहे. दररोज एक तरी महिला किंवा मुलगी बेपत्ता होत असल्याने हा गंभीर मुद्दा बनला आहे.अशीच एक घटना नुकतीच कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिनाक २९ ऑगस्ट रोजी उघड झाली आहे.
याबाबत कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात मुलीच्या पित्याने गुन्हा दाखल केला असून त्यात त्याने आपली मुलगी ही २९ ऑगस्ट रोजी रात्री ०९ते १२.३० बाजेच्या दरम्यान गायब झाली आहे. त्यामुळे मुलीच्या पित्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे.त्यांनी तातडीने तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान घटनास्थळी शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने, कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी,पोलिस हे.काँ.संदीप बोटे यांनी भेट दिली आहे. या घटनेने पालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.