गुन्हे विषयक
…’ त्या ‘ गुन्ह्यातील आरोपीवर अखेर खुनाचा गुन्हा दाखल!

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चासनळी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी दिलीप मिजगुले याने अंगणवाडी सेविका असलेली आपली पत्नी स्वाती मिजगुले हिचा उशीने तोंड दाबून हत्या केली आहे.त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर तालुका पोलिस उपनिरिक्षक कमलाकर चौधरी यांनी आरोपी दिलीप मिजगुले याचे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

चासनळी येथील आपल्याच स्वाती मिजगुले या पत्नीचा खून केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक कमलाकर चौधरी यांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”शुक्रवार दि.२२ ऑगस्ट२०२५ रोजी सकाळी दिलीप मिज गुले याने प्रथम अज्ञात कारणाने त्याने पत्नीला मारहाण केली त्यानंतर उशीने तोंड दाबून तिची हत्या केली असल्याची माहिती उघड झाली होती.त्यानंतर त्याने स्वतःही आत्महत्या केली होती.याबाबतीत त्याने काही संशयित आरोपींची नावे घराच्या भिंतीवर लिहून स्वतः ही आत्महत्या केली होती. त्यामुळे चासनळी आणि कोपरगाव तालुक्यातील ग्रामस्थांत खळबळ उडाली होती.त्यामुळे त्याच गावातील संशयित आरोपी गोरख चौरे,संदीप चौरे,आशा चोरे आदी तीन जणांवर भारतीय न्याय संहिता कलम १०८,३(५) गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी संशयित आरोपी गोरख चौरे,संदीप चौरे,आशा चोरे आदी तीन जणांवर भारतीय न्याय संहिता कलम १०८,३(५) प्रमाणे गुन्हा (२४२/२०२५) दाखल केला आहेे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी चौकशी करून या मयत आरोपीने भिंतीवर लिहिलेल्या तीन संशयित आरोपींवर आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
तर आपल्याच स्वाती मिजगुले या पत्नीचा खून केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक कमलाकर चौधरी यांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान घटनास्थळी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी, पोलीस उपनिरिक्षक कमलाकर चौधरी आदींनी धाव घेऊन स्थळपंचनामा केला होता.
कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.२४७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३चे कलम १०३ प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास शिर्डी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप कोळी हे करीत आहेत.