जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

ग्रामसेवकाची आत्महत्या बी.डी.ओ.सह दोघांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

    नेवासा तालुक्यातील करजगाव येथील मूळ रहिवासी मात्र अंजनापूर येथे कार्यरत असलेले  ग्रामपंचायत अधिकारी बाजीराव रखमाजी बाचकर यांनी ०८ ऑगस्ट रोजी पहाटे आत्महत्या केल्या प्रकरणी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदिप दळवी व विस्तार अधिकारी बबन वाघमोडे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सोनई पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्यानें कोपरगाव तालुक्यातील अधिकारी आणि प्रशासनात खळबळ उडाली आहे.

मयत ग्रामपंचायत अधिकारी बाजीराव बाचकर.

 

नेवासा तालुक्यातील करजगाव येथील रहिवासी बाजीराव बाचकर कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर या गावी ग्रामसेवक पदावर कार्यरत होते.त्यांनी विषारी औषध प्राशन,केल्याने त्यांचा मृत्यू झाला.त्यांचा मृत्यू वरिष्ठांच्या मानसिक व आर्थिक छळाला कंटाळून केलेली आत्महत्या असल्याचा आरोप  करण्यात आला आहे.
आरोपात कोपरगाव येथील पंचायतचे गटविकास अधिकारी संदीप दळवी व विस्तार अधिकारी बबन वाघमोडे यांचा समावेश आहे.

  कोपरगाव तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या होत्या.त्यात ग्रामपंचायत अधिकाऱ्यात बाजीराव बाचकर समावेश होता.त्यांची बदली मायगाव देवी ग्रामपंचायत या गोदावरी काठच्या ठिकाणी झाली होती.मात्र बदलीनंतर हे त्याजागी हजर झाले नव्हते अशी माहिती हाती आली आहे.बदलीच्या जागी हजर होण्याऐवजी त्यांनी दिनाक १७ जुलै २०२५ पासून रजा टाकली होती.व त्यानंतर ते आपल्या मूळगावी करजगाव या ठिकाणी निघून गेले होते.
दरम्यान त्यांनी आपली आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या काही सहकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असल्याची माहितीची उपस्थितांत चर्चा होती.त्याअंदाजाप्रमाणे घटना घडून आल्या आहेत.

  नेवासा तालुक्यातील सोनई पोलीस ठाण्यात त्यांची पत्नी प्रमिला बाचकर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की,”नेवासा तालुक्यातील करजगाव येथील रहिवासी बाजीराव बाचकर कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर या गावी ग्रामसेवक पदावर कार्यरत होते.त्यांनी विषारी औषध प्राशन,केल्याने त्यांचा मृत्यू झाला.त्यांचा मृत्यू वरिष्ठांच्या मानसिक व आर्थिक छळाला कंटाळून केलेली आत्महत्या असल्याचा आरोप  करण्यात आला आहे.त्यांनी कोपरगाव येथील पंचायतचे गटविकास अधिकारी संदीप दळवी व विस्तार अधिकारी बबन वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी धनगर समाजाचे नेते तसेच करजगाव ग्रामस्थांनी सोनई पालीस ठाण्यासमोर ठाण मांडले होते.

  दरम्यान सोनई पोलिस ठाण्यात मयत बाजीराव बाचकर यांच्या पत्नी प्रमिला बाचकर (वय-३८) यांच्या फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३०३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३(५) प्रमाणे कोपरगावचे गटविकास अधिकारी संदीप दळवी व विस्तार अधिकारी बबन वाघमोडे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी करत आहेत. त्यामुळे कोपरगाव पंचायत समितीच्या प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close