गुन्हे विषयक
…’ त्या’ हत्या,आत्महत्येचे कारण उघड!

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
आपल्या माहेरी गेलेल्या पत्नीने परत येण्यास नकार दिल्याने, तिला घ्यायला निघालेल्या पतीने आपल्या चार अल्पवयीन मुलांना विहिरीत ढकलून दिले आणि विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.सदरची घटना तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारातील शिर्डी बाह्यवळण रस्त्यालगत असलेल्या साठवण तलावाजवळ शनिवारी उघडकीस आल्याने सर्वत्र हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे.

महिलेचा पती अरुण काळे हा त्रास देत असल्याने त्याची पत्नी त्याच्यासोबत राहात नव्हती. अरुण मुलांना सोबत घेऊन पत्नीला आणण्यासाठी येवला येथील सासुरवाडीला निघाला होता.यावेळी त्याने वाटेतच पत्नीला दूरध्वनी करत,”तू नांदायला ये,नाहीतर मुलांना मारून टाकत आत्महत्या करेल,अशी धमकी त्याने दिली होती. दरम्यान तिने नकार देताच त्याने रागाच्या भरात वाटेतच राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारातील शिर्डी बाह्यवळण रस्त्यालगत एका विहिरीमध्ये मुलांना ढकलून देऊन आत्महत्या केली आहे.
श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी या संदर्भात माहिती दिली असून मयत मुलांचा पिता अरुण सुनील काळे (वय ३०,रा.चिखली,कारेगाव ता. श्रीगोंदा,अहिल्यानगर), शिवानी अरुण काळे (वय ८), प्रेम अरुण काळे (वय ७), वीर अरुण काळे (वय ६) आणि कबीर अरुण काळे (वय ४) अशी मृतांची नावे आहेत.
कोहाळे शिवारातील भाऊसाहेब घोंडिबा कोळगे यांच्या शेतातील गट नंबर २६९ मधील विहिरीमध्ये शनिवारी दोन मृतदेह तरंगताना आढळल्याचे केलवडचे पोलीस पाटील सुरेश गमे यांनी राहाता पोलिस ठाण्यास कळवले होते.सदरची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली होती.परिणामी विहिरीनजीक परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
केलवड येथील पोलिस पाटलांनी घटनेचे गांभीर्य पोलिसांना कळवले असता पोलिसांसह शिर्डी व राहाता येथील नगरपरिषदेचे आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले होते.विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने पाण्यात उतरून मदतकार्य अशक्य होते.अखेर गळ सोडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि एकापाठोपाठ एक मृतदेह सायंकाळी बाहेर काढण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,महिलेचा पती अरुण काळे हा त्रास देत असल्याने त्याची पत्नी त्याच्यासोबत राहात नव्हती. अरुण मुलांना सोबत घेऊन पत्नीला आणण्यासाठी येवला येथील सासुरवाडीला निघाला होता.यावेळी त्याने वाटेतच पत्नीला दूरध्वनी करत,”तू नांदायला ये,नाहीतर मुलांना मारून टाकत आत्महत्या करेल,अशी धमकी त्याने दिली होती. दरम्यान तिने नकार देताच त्याने रागाच्या भरात वाटेतच राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारातील शिर्डी बाह्यवळण रस्त्यालगत एका विहिरीमध्ये मुलांना ढकलून देऊन आत्महत्या केली. त्यापैकी अरुण सुनील काळे,शिवानी काळे, वीर काळे यांचे मृतदेह दुपारी ०५ च्या सुमारास विहिरीच्या बाहेर काढण्यात तर दोन मुलांचे मृतदेह रात्री बाहेर काढले.काळेने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचा संशय ग्रामस्थांनी घटनास्थळापासून काही अंतरावर व्यक्त केला आहे.त्याची दुचाकी (एम.एच.डी.एल.१९४४) ही जवळच आढळली होती..