जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

… या तालुक्यात ०४ अल्पवयीन मुलांसह बापाचा मृतदेह ?

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारात शिर्डी बाह्यवळण रस्त्यालगत असलेल्या साठवण तलावाच्या जवळ असलेल्या विहिरीत साधारण ०८ ते १० वयाच्या अज्ञात ०१ लहान मुलीसह ०३ मुलांसह बापाचा मृतदेह आढळून आल्याने राहाता,कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.त्या ठिकाणी राहाता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर मृतदेह काढण्याचे काम सुरू केले असून दोन मध्ये यश मिळाले आहे तर अद्याप एक विहिरीच्या तळात असलेल्या लहान मुलाचा मृतदेह शोधण्याचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती हाती आली आहे.त्यात बापाचे नाव अरुण अनिल काळे आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

शोधमोहीम सुरू असताना पोलिसाना ही अल्पवयीन बालिका सापडली असल्याचे  दिसत आहेत.

श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी नजीकच्या चिखली येथील ०३ अल्पवयीन मुले व ०१ मुलगी आणि त्यांचा पिता गायब झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.याबाबत घरात पतिपत्नीचा बेबनाव होऊन ०४ अल्पवयीन मुले गायब झाल्याची मिसिंग दाखल झाल्याचा अंदाज असून त्यानुसार पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली होती. येथील पोलिसांनी राहाता पोलिसांची मदत घेऊन ही शोध मोहीम राबवली असल्याने राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे गावाच्या दक्षिणेस हाकेच्या अंतरावर असलेल्या शेततळ्याजवळ पोलिसांना त्या मुलांचा शोध लागला आहे.

 

 घटनास्थळी असलेल्या विहिरीत दोन शालेय गणवेशातील अल्पवयीन मुले हृदय पिळवटून टाकताना दिसत आहे.

  कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदेकसारे येथील काटवनात शनिवार दि.०९ ऑगस्ट रोजी आपली खून केलेली पहिली पत्नी वनिता हिरामण मोहिते हिचा तिचा आरोपी पती संजय हिरामण मोहिते याला अटक केल्यानंतर कोपरगाव शहर पोलिसांनी त्याला सहाय्य करणारा त्याचा मेहुणा (लहान बायकोचा भाऊ) गजानन मोतीराम मोहिते याला खामगाव बुलढाणा येथून अटक केल्यानंतर शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या हद्दीत ही ०८ दिवसातील दुसरी घटना उघड झाली आहे.

घटनास्थळी मृतदेह रुग्णालयात नेताना स्वयंसेवक दिसत आहे.

  दरम्यान आमच्या प्रतिनिधीने याबाबत अधिकची माहिती घेतल्यानंतर असे समजले आहे की,श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी नजीकच्या चिखली येथील ०४ अल्पवयीन मुले गायब झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.याबाबत घरात पतिपत्नीचा माहेराहून सासरी येण्यावरून बेबनाव होऊन ०४ अल्पवयीन मुले व त्यांचा पिता गायब झाल्याची मिसिंग दाखल झाल्याचा अंदाज असून त्यानुसार पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली होती.घटनास्थळी होंडा शाईन गाडी आढळून आली आहे.

शिर्डी बाह्य वळण रस्त्यालगत कोऱ्हाळे येथे घटनास्थळी ग्रामस्थांची विहिरीलगत झालेली गर्दी दिसत आहे.

दरम्यान येथील पोलिसांनी राहाता पोलिसांची मदत घेऊन ही शोधमोहीम राबवली असल्याने राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे गावाच्या दक्षिणेस हाकेच्या अंतरावर असलेल्या शेततळ्याजवळ पोलिसांना त्या मुलांचा शोध लागला असल्याची माहिती हाती आली आहे.घटनास्थळी विहिरीच्या कडेला चपला आणि दारूच्या बाटल्या आढळून आल्याने पोलिस पाटील आणि स्थानिकांनी ही बाब राहाता पोलिसांना कळवली होती.त्यावरून या घटनेचा शोध लागला असल्याचा एक मतप्रवाह आहे.पोलिसांनी मयत इसमाच्या पत्नीशी संपर्क साधून तिला फोटो पाठवले असता मयत इसम आणि मुले त्यांची असल्याच्या घटनेस तिने दुजोरा दिला आहे.ते रात्री येवल्यातून आपल्या घरी जाताना त्याने संतापात हे कृत्य केले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

  त्यातून एक मुलगा आणि एक मुलीसह पित्याचा मृतदेह हाती आला आहे.अजून दोन मुलांचे मृतदेह असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.पतीने घरातील कलहांला वैतागून त्यांना आणि स्वतःच्या जीवाला बरेवाईट केले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.मयत इसमाची सासुरवाडी येवला असल्याची माहिती हाती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close