जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महिलेचा खून,आरोपी अज्ञात,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदेकसारे येथील काटवणात काल दुपारी ४.३० बाजेच्या पूर्वी अज्ञात आरोपीने साधारण ४५ वय असलेल्या महिलेचा अज्ञात कारणाने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिला जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे उघड झाले असून याबाबत चांदेकसारे येथील महिला पोलिस पाटील मीराबाई गोरक्षनाथ रोकडे (वय-५६) यांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान २०१६ साली कोपरगाव तालुक्यातील अंचलगाव शिवारात रेल्वे मार्गाच्या पूर्वेस एका विहिरीत उच्चभ्रू घरातील तीन मृतदेह आढळून आले होते.त्यांचाही अद्याप पोलिसांना शोध लागलेला नाही.त्यातच पुन्हा एक अज्ञात महिलेचा खून हे पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील शिवारात साधारण सात -आठ वर्षापूर्वी जुन्या नाशिक रोडवर झगडे फाट्यानजिक पोलिस चौकीत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता.त्याचा बरेच दिवस तालुका पोलिसांनी शोध घेऊनही आरोपी आणि महिलेची ओळख पटली नव्हती.आता पुन्हा एकदा कोपरगाव शहर पोलिसांपुढे एक आव्हान उभे ठाकले आहे.चांदेकसारे शिवारात डाऊच बुद्रुक शिवारात उंबरी नाक्याजवळ काटवणात वय ४०- ४५ वर्षे असलेल्या अज्ञात महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आला आहे.

सदर मयत महिलेचे केस मोकळे सोडलेले तर डोळे अर्धोनमिलित आहे.जीभ दाताखाली दबलेली दिसत आहे.दोन्ही हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या तर उजव्या हातावर स्टार चिन्ह तर काहीतरी नाव गोंदलेले दिसत असून त्यातून बोध मात्र होत नाही.गळ्यात काळे पिवळे मणी असलेली पोत दिसत असून गळ्यात तुळशीची माळ असल्याने ही महिला हिंदू असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

  मयत महिलेच्या प्रेताची दुर्दशा इतकी वाईट आहे की,प्रेत कमरेपासून खाली अर्धवट जळाले ले असून प्रेताचा डावा पाय शरीरापासून वेगळा झालेला आहे.केस मोकळे सोडलेले तर डोळे अर्धोनमिलित आहे.जीभ दाताखाली दबलेली दिसत आहे.दोन्ही हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या तर उजव्या हातावर स्टार चिन्ह तर काहीतरी नाव गोंदलेले दिसत असून त्यातून बोध मात्र होत नाही.गळ्यात काळे पिवळे मणी असलेली पोत दिसत असून गळ्यात तुळशीची माळ असल्याने ही महिला हिंदू असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.पायामध्ये पांढऱ्या (बहुधा चांदीचे ) पैजण,तसेच जोडवे दिसत आहे.या शिवाय अंगावर अर्धवट जळालेली हिरव्या रंगाची काठपदराची साडी त्याच रंगाचा ब्लाऊज दिसत आहे.त्यामुळे अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी या महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत अयशस्वीपणे जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसत आहे.

  दरम्यान ही घटना समजताच श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे,शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने,शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार,पोलिस उपनिरीक्षक दीपक रोठे,संदीप सोन्ने,संजय पवार यांनी भेट देऊन तपास सुरू केला आहे.

  दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध अज्ञात महिलेचा अज्ञात कारणासाठी खून केल्या प्रकरणी गुन्हा क्रं.४१४/२०२५,भारतीय न्याय संहिता कलम १०३(१),२३८(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वामने यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कुंभार हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close