गुन्हे विषयक
जावयाला गंभीर मारहाण,आजे सासरा जखमी,गुन्हा दाखल ?

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख हद्दीत आपल्या पत्नीस आणण्यास गेलेल्या जावयास,मेहुणा,मुलीचा मामा,सासरा आणि अन्य नातेवाईकांनी हातातील लोखंडी गज,कुऱ्हाडीचा दांड्याच्या सहाय्याने केलेल्या मारहाणीत चिंचोली गुरव तालुका संगमनेर येथील तरुण किरण सुनील सोनवणे (वय -२६) व आजे सासरा भास्कर पानगव्हाणे हे दोघे गंभीररीत्या जखमी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून यातील जखमी किरण सोनवणे हा शिर्डी येथे तर भास्कर पानगव्हाणे हे कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती हाती आली आहे.

दरम्यान या हाणामारीत चिंचोली गुरव येथील तरुण तथा जावई किरण सुनील सोनवणे याला दोन्ही हात,दोन पाय आणि जबडा यास गंभीर दुखापत झाली असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे तर जखमी जावयाचे आजे सासरा भास्कर पानगव्हाणे हेही गंभीर जखमी झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील तरुण किरण सोनवणे याचे लग्न मागील वर्षी कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील तरुणीशी धूमधडाक्यात झाले होते.मात्र त्यांच्यात नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर अवघ्या दोन तीन महिन्यात अज्ञात कारणाने बेबनाव निर्माण झाला होता.त्यामुळे सदर तरुणाची पत्नी आपल्या माहेरी निघून आली होती.तिला घेण्यासाठी तो काल दुपारी ,०१ वाजेच्या सुमारास चिंचोली गुरव येथून कोणाला काही न सांगता आपल्या सासुरवाडीस गेला होता.माहेगाव देशमुख येथे गेल्यावर त्या ठिकाणी त्याचा मेहुणा व त्याच्यात काही कारणावरून आधी बाचाबाची झाली होती.त्यानंतर त्याने बहादरपूर येथील आपल्या रहाणे नामक मामाला बोलावून घेतले होते. त्यानंतर त्याचे रूपांतर थेट लोखंडी गज आणि कुऱ्हाडीच्या दांड्याने तुंबळ हाणामारीत झाले होते.

या प्रकरणी आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी गिरीश बुट्टे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी वरील तरुण किरण सोनवणे यास दोन्ही पायाला गंभीर दुखापत तर भास्कर पानगव्हाणे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असल्याच्या घटनेस दुजोरा दिला आहे.
दरम्यान या हाणामारीत चिंचोली गुरव येथील तरुण तथा जावई किरण सुनील सोनवणे याला दोन्ही हात,दोन पाय आणि जबडा यास गंभीर दुखापत झाली असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे तर जखमी जावयाचे आजे सासरा भास्कर पानगव्हाणे हेही गंभीर जखमी झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
या प्रकरणी आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी वरील तरुण किरण सोनवणे यास दोन्ही पायाला गंभीर दुखापत तर भास्कर पानगव्हाणे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असल्याच्या घटनेस दुजोरा दिला आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला असून वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन्ही रुग्णांबाबत एम.एल.सी.दाखल झाली असून त्याबाबत जाबजबाब नोंदविण्याचे काम सुरू असून लवकरच गुन्हा दाखल होत असल्याची माहिती दिली आहे.
त्यामुळे हा सासऱ्या जावयाच्या भांडणाची कोपरगाव सह संगमनेर तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली असून या हाणामारीत बहादरपूर येथील एक मुलीचा नवनाथ रहाणे हा मामा सामील असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील खरे आरोपी आणि गुन्ह्यातील कलमे उघड होणार आहेत.