गुन्हे विषयक
चोरटे रंगेहाथ पकडले,कोपरगावात गुन्हा दाखल

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक येथे आज बुधवारी १६ जुलै पहाटेच्या सुमारास डाळिंब चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून सजग शेतकरी अर्जुन दिलीप गवळी यांनी सावधगिरी दाखवल्याने चोरी करणारे चोरटे सापळ्यात अलगत अडकले आहेत.तालुका पोलिसांनी त्यांना गजाआड केले असून त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

वर्तमानात नागरिक,शेतकरी आदींनी पिकवलेले किंवा कमावलेले आपल्या घरात येईल याची कोणतीही शाश्वती राहिलेली नाही.एकतर शेतकऱ्यांना सरकार हमीभाव द्यायला तयार नाही.जास्त पिकले तर व्यापारी भाव पाडतात.किंवा वादळ वारा हिसकावून घेताना दिसतो.राजाने मारले आणि पावसाने झोडपले तर तक्रार कोणाकडे करायची अशा स्थितीत राज्यासह कोपरगाव तालुक्यातील शेतकरी अडकले आहेत.

कोपरगाव तालुक्यात चोरटे पोलिसांचे काही ऐकण्याच्या स्थितीत दिसत नाही आणि चोऱ्या थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही.परिणामी नागरिक,शेतकरी आदींनी पिकवलेले किंवा कमावलेले आपल्या घरात येईल याची शाश्वती राहिलेली नाही.एकतर शेतकऱ्यांना सरकार हमीभाव द्यायला तयार नाही.जास्त पिकले तर व्यापारी भाव पाडतात.किंवा वादळ वारा हिसकावून घेताना दिसतो.राजाने मारले आणि पावसाने झोडपले तर तक्रार कोणाकडे करायची अशा स्थितीत शेतकरी अडकले आहेत.अशीच घटना आज पहाटेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील मढी येथे उघडकीस आली आहे.यातील शेतकरी अर्जुन गवळी यांना पहाटेच्या सुमारास आपल्या शेतात काहीतरी संशयित हालचाल आणि विजेऱ्या चमकताना दिसून आल्यावर त्यांनी आपल्या डाळिंब शेतात धाव घेतली असता काही चोरटे दोन दुचाकीवर येऊन विजेरीच्या सहाय्याने डाळिंब चोरताना आढळून आले होते.त्यांनी सावधानता बाळगत तत्काळ कोपरगाव तालुका पोलिसांशी संपर्क साधला पोलिस निरीक्षक संदीप कोळी आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी धावून गेल्यावर त्या ठिकाणी त्यांना चोरटे डाळिंब चोरून नेण्याच्या उद्देशाने ते तोडताना आढळून आले आहे.त्या ठिकाणी आपल्या दुचाकी सोडून पळून गेल्याचे आढळून आले आहे.घटनास्थळी शेतकरी अर्जुन गवळी यांनी आरडाओरडा केल्यावर चोरटे आपल्या दोन दुचाकी सोडून पळून गेले आहेत.

सदर कारवाई कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे,कमलाकर चौधरी,पोलिस हे.कॉ.मधुसूदन दहिफळे,संदीप बोटे,किसन सानप,अनिस शेख,अमोल फटांगरे,नवनाथ गुंजाळ,ऋतिक बेनके आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.त्यांचे व सजग शेतकऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी आपल्या फौजफाट्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी घटनास्थळावरील २ दुचाकी ताब्यात घेतल्या असून अवघ्या काही तासांत या चोरी प्रकरणी पोलिसांनी आरोपी गोरख सकाहरी बर्गे (रा.दहिवडी,ता.सिन्नर) आणि गौतम विष्णू जगताप (रा.रामपूर,सिन्नर) या दोघांना अटक केली आहे.त्यांच्याकडून सुमारे ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे,कमलाकर चौधरी,पोलिस हे.कॉ.मधुसूदन दहिफळे,संदीप बोटे,किसन सानप,अनिस शेख,अमोल फटांगरे,नवनाथ गुंजाळ,ऋतिक बेनके आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.त्यांचे व सजग शेतकऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.