जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

जादूटोणा भोवला,ख्रिचन फादर विरुद्ध गुन्हा दाखल !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या खडकी येथील रहिवासी असलेल्या महिलेला कावीळ झालेली असताना तिला बाहेरचे झाल्याची बतावणी तीच्यावर जादूटोणा करून
वनिता विश्वनाथ हरकळ (वय-४२) हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला समतानगर येथील ख्रिचन फादर चंद्रशेखर गौडा याचे विरुद्ध मयत महिलेचा भाऊ संजय जीवन पांढरे याने गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

दि.२० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ.नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर २४ ऑगस्टला महाराष्ट्र सरकारने याविषयीचा अध्यादेश काढला.२०१३ डिसेंबरच्या नागपूर अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येऊन विधानसभा आणि विधानपरिषदेत विधेयक संमत झालं आणि वटहुकुमाचं कायद्यात रूपांतर झालं.अशाप्रकारचा कायदा करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य झाल्याचे ढोल पिटवले गेले पण अजूनही हा जादूटोणा बंद झाल्याचे आढळून येत नाही.अशीच ताजी घटना कोपरगाव शहराच्या खडकी उपनगरात उघड झाली आहे.

   अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पहिल्यांदा १९८९ मध्ये अशा प्रकारचा कायदा तयार करण्यासाठीची मागणी केली.अंनिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि अंनिस यांनी या कायद्याचा मसुदा तयार केला आणि महाराष्ट्रातल्या अनेक सरकारांकडे यासाठी पाठपुरावा केला त्यानंतर तब्बल १४  वर्षं हे विधेयक अडकलं होते.अंधश्रद्धा विरोधी कायदा असं मूळ नाव बदलून दरम्यानच्या काळात जादूटोणा विरोधी कायदा असं करण्यात आलं.२० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ.नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर २४ ऑगस्टला महाराष्ट्र सरकारने याविषयीचा अध्यादेश काढला.२०१३ डिसेंबरच्या नागपूर अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात आलं. विधानसभा आणि विधानपरिषदेत विधेयक संमत झालं आणि वटहुकुमाचं कायद्यात रूपांतर झालं.अशाप्रकारचा कायदा करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य झाल्याचे ढोल पिटवले गेले पण अजूनही हा जादूटोणा बंद झाल्याचे आढळून येत नाही.अशीच ताजी घटना कोपरगाव शहराच्या खडकी उपनगरात उघड झाली आहे.यातील आरोपी ख्रिचन फादर आणि मृत महिला यांची ओळख होती.मयत महिला हिला कावीळ झाली असताना तसे शहरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निदान केलेले असताना व औषधे दिलेली असताना त्यास संबंधित समतानगर येथील फादर चंद्रशेखर गौडा याने ते देण्यास प्रतिबंध करून तिला बाहेरचे (म्हणजे भूत बाधा वैगरे समजले जाते) झाले असल्याची बतावणी करून कावीळ साठी एक खोबरे तेल बाटली देऊन ती मंत्रून पिण्याचा अघोरी सल्ला दिला होता.त्यातून काविळीचा आजार मोठ्या प्रमाणावर बळावला व हाताबाहेर जाऊन ती मृत्यूच्या दारात जाऊन पोहचली होती.मात्र जास्त आजार बळावल्यावर तिला लोणी येथील रुग्णालयात हलवले होते तेथे तिचा लोणी येथे दिनांक ०९ जुलै २०२५ रोजी उपचार सुरू असताना मृत्यू ओढवला असल्याचा आरोप करून  फिर्यादी भाऊ संजय पांढरे याने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

    दरम्यान या प्रकरणी संजय जीवन पंढरे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी फादर चंद्रशेखर गौडा रा.बागुल वस्ती ता.कोपरगाव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिताचे कलम १०६ (१) सह महाराष्ट्र जादू टोणा प्रतिबंध अधिनियन २०१३ चे
कलम ३(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close