गुन्हे विषयक
…या ठिकाणी चाकू दाखवून लूट,गुन्हा दाखल

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील समृध्दी महामार्गावर पोल क्रं.५१८/६ जवळ आज पहाटे ३.३० च्या सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी नागपूर कडून मुंबईकडे जाणाऱ्या व नादुरुस्त झालेल्या गाडीमधील प्रवाशांना गाडीवर काठीने मारून त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून दोन विविध कंपन्यांचे मोबाईल घेऊन पोबारा केला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणी त्यांनी नागपूर,कोराडी,कामटी येथील कार चालक फिर्यादी ईश्वर रमेश कमाले (वय-२६) कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

गाडीतील इसम हे समृध्दी महामार्गाने जात मुंबईकडें जात असताना त्यांची गाडी वरील ठिकाणी बंद पडली होती.परिणामी त्यांना आपली गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून दिवस उगण्याची वाट पाहावी लागली असताना आज पहाटे साडे तीन वाजता अज्ञात चार चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत त्यांना एका चाकू आणि काठीने धमकी देत दोन मोबाईल घेऊन पोबारा केला आहे.
कोपरगाव शहर आणि तालुक्यातील गुन्हे काही कमी होण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे चोरट्यांचा विश्वास वाढत चालला असल्याचे वारंवार दिसून येत असून त्यात वरचेवर वाढ होत आहे.अशीच घटना आज पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास नागपूर-मुंबई या समृध्दी महामार्गावर घडली आहे.यातील फिर्यादी इसम हे नागपूर येथील रहिवासी असून ते आपल्या काही खाजगी कामासाठी मुंबई-नागपूर या समृध्दी महामार्गाने जात मुंबईकडें जात असताना त्यांची गाडी वरील ठिकाणी बंद पडली होती.परिणामी त्यांना आपली गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून दिवस उगण्याची वाट पाहावी लागली असताना आज पहाटे साडे तीन वाजता अज्ञात चार चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत त्यांना एका चाकू आणि काठीने धमकी देत आणि जीवे मारण्याचा दम भरला होता.व त्यांना गाडीची काच उघडण्यास भाग पाडले होते.काच उघडल्यानंतर त्यांनी त्यांच्या ताब्यातील दोन मोबाईल त्यातील रियल मी-११ प्रो ५ जी हा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल (क्रं.९२७२ ००० ५३८)हिसकावून घेतला असून एक आणखी त्यांचं कंपनीचा रियल मी १४ प्रो हा १५ हजार रुपये किमतीचा दुसरा मोबाईल (क्रं.८२३७२५ ६२९२) चोरून नेला आहे.
या प्रकरणी त्यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रं.२८९/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा कलम ३०९(४) प्रमाणे अज्ञात आरोपी विरुध्द दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे,पोलिस उपनिरीक्षक संजय पवार आदींनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक रोठे हे करीत आहेत.दरम्यान या घटनेने समृध्दी महामार्गावरील प्रवाशांत आणि वाहन धारकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.