गुन्हे विषयक
खिडकी तोडून घरात प्रवेश,कोपरगावात चोरीचा गुन्हा !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात माजी खा.स्व.सूर्यभान पाटील वहाडणे आय.टी.आय.च्या पश्चिमेस हाकेच्या अंतरावर असलेल्या बिल्डर राजेश ठोळे यांच्या भाग्यनगर येथील प्लॉट मध्ये झाडांची देखरेख करणारे कामगार गोरक्षनाथ वसंत खैरनार खडकी यांच्या घराची खिडकी तोडून घरात प्रवेश करून गॅस टाकी,शेगडी,रोख रक्कम,अन्य चीज वस्तू असा हजारो रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.त्यामुळे खडकी आणि परिसरात नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

सचिन वॉच कंपनीत जवळपास ३० लाख रुपयांची चोरी,काकडी विमानतळावर तीन खून पडले त्यातील आरोपी पोलिसांनी चोवीस तासांच्या आत जेरबंद केले आहे.मात्र गुन्हे घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा काय करते हे समजायला मार्ग नाही.पोलिसांचे खरे कसब हे गुन्हा घडण्याच्या आधी गुन्ह्यांना प्रतिबंध करणे त्यांच्यावर नियंत्रण आणणे व धाक निर्माण करणे आवश्यक आहे.मात्र असे घडताना दिसत नाही.त्यामुळे या यंत्रणेवर कोणाचा वचक आहे का असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.
कोपरगाव शहर आणि तालुक्यातच चोरट्यांनी घातलेला धुमाकूळ काही कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही.परिणामी नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.संदीप बोळींज व त्यांची पत्नी हे आपल्या दुचाकी वरून दिनाक १४ मे २०२५ च्या रात्री वैजापूरवरून कोपरगावच्या दिशेनं येत असताना त्यांच्या गाडीचा पाठलाग करून उक्कडगाव तीळवणी यांच्या मध्ये असलेल्या उपबाजार समितीचे जवळ दोन दुचाकीस्वारांनी त्यांना अडवून त्यांच्याकडील असलेल्या कोयत्याचा धाक दाखवून सदर महिलेच्या अंगावरील दागिने काढून घेतले होते.त्यांना काही दिवसात तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे.सचिन वॉच कंपनीत जवळपास ३० लाख रुपयांची चोरी झाली होती त्या चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अद्याप दोन आरोपी नेपाळला पळून गेले आहे.काकडी विमानतळावर तीन खून पडले त्यातील आरोपी पोलिसांनी चोवीस तासांच्या आत जेरबंद केले आहे.मात्र गुन्हे घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा काय करते हे समजायला मार्ग नाही.पोलिसांचे खरे कसब हे गुन्हा घडण्याच्या आधी गुन्ह्यांना प्रतिबंध करणे त्यांच्यावर नियंत्रण आणणे व धाक निर्माण करणे आवश्यक आहे.मात्र असे घडताना दिसत नाही परिणामी गुन्ह्याचा दर वाढताना दिसत आहे.अशीच घटना आज पहाटे एक ते दोन वाजेच्या सुमारास घडली आहे.

यातील कामगार गोरक्षनाथ खैरनार हे त्यांची आई,पत्नी,तीन मुले,दोन मुली आदी सोबत ठोळे यांच्या भाग्यनगर येथे असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये राहत आहे.त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे दिसत आहे.वर्तमानात वळवाच्या पावसाचे थैमान असल्याने आपल्या घरी जेवण झाल्यावर शेजारी पूर्व बाजूस असलेल्या शेडमध्ये सोपण्यास गेले होते.दरम्यान त्यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या चोरट्यांनी ते झोपी गेले असल्याची खात्री झाल्यावर त्यांच्या घराची खिडकीचे नट-बोल्ट खोलून आत प्रवेश करून त्यातील भारत गॅस कंपनीची भरलेले टाकी लंपास केली आहे.शिवाय कपाटातील सामानाची उच्क पाचक करून त्याईल किडूक-मिडुक घेऊन पोबारा केला आहे.मात्र या चोरीत नेमका किती ऐवज गेला हे समजू शकले नाही.

त्यांनी या प्रकरणी सकाळी ०७ वाजेच्या सुमारास संजय पोटे यांच्या दूरध्वनीद्वारे कोपरगाव शहर पोलिसांना खबर दिली आहे.अद्याप घटनास्थळी पोलिस पोहचलेले नाही परिणामी अद्याप गुन्हा दखल झालेला नाही.त्यामुळे या चोरीत किती ऐवज गेला हे समजू शकले नाही.मात्र खडकी,समतानगर,साईसिटी आदी उपनगरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.