जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

….’त्या’ घटनेत आणखी एक बळी,स्वतंत्र गुन्हा नाही !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
 

    कोपरगाव तालुक्यातील काकडी (शिर्डी) विमानतळाला लागून दक्षिण बाजूस असलेल्या भोसले वस्तीवर ५ एप्रिल रोजी पहाटे झालेल्या हल्ल्यातील आरोपी नगर पोलिसांनी जेरबंद करून त्यांना नुकतेच कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांचेसमोर हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्या.भगवान पंडित यांनी आरोपी संदीप दहाबाड व जगन काशिनाथ किरकिरे यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असताना या हल्ल्यातील जखमी महिला साखरबाई भोसले (वय -५५ ) यांचे आज पहाटे शिर्डी येथील साईबाबा संस्थान रुग्णालयात निधन झाले आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

    

मयत साखरबाई साहेबराव भोसले यांचे छायाचित्र.

दरम्यान या प्रकरणी राहाता येथील पोलिसांनी शिर्डी येथील रुग्णालयात पंचनामा केला असल्याची माहिती आहे.तर या घटनेत पहिला जो दोन खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे यात अधिक एकची भर पडणार नसल्याची माहिती राहाता पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी दिली आहे.

  सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील काकडी विमानतळाच्या दक्षिण बाजूस असलेल्या भोसले वस्तीवर दिनांक ०५ एप्रिल २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास काही चोरट्यांनी पाळत ठेऊन मयत साहेबराव पोपट भोसले (वय-६०) यांच्या वस्तीवर सशस्त्र हल्ला चढवला होता.त्यात चोरट्यांनी त्यांच्याच फावड्याने जोरदार प्रहार करून ते स्वतः सह त्यांचा मुलगा कृष्णा साहेबराव भोसले (वय-३२) हे जागीच ठार केले असल्याचे दिसून आले होते.तर त्यांची पत्नी साखरबाई भोसले या गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांच्यावर शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात एक शस्त्रक्रिया होऊन त्यानंतर उपचार सुरू होते.मात्र त्यांची प्रकृती उत्तोरोत्तर खालावत गेली होती.त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांची चिंता वाढली होती.त्यानंतर आज पहाटे ०५ वाजता उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले असल्याची माहिती मयत साहेबराव भोसले यांचे संवत्सर येथील जवळचे नातेवाईक बाळासाहेब दहे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यांच्यावर आज सायंकाळी ५.५० वाजता काकडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

      दरम्यान या प्रकरणी राहाता येथील पोलिसांनी शिर्डी येथील रुग्णालयात पंचनामा केला असल्याची माहिती आहे.या घटनेने काकडी आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान यात पहिला जो दोन खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे यात अधिकची भर पडणार नसल्याची माहिती राहाता पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close