गुन्हे विषयक
ठेकेदार मारहाण प्रकरण,दोन आरोपींना ठोकल्या बेड्या !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील नवीन आय.टी.आय.इमारतीसमोर दिनांक २४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास नगरपरिषदेचे डांबरीकरणाचे काम करणारे ठेकेदार योगेश दत्तात्रय मोरे यांचे सह अन्य साथीदारांवर झालेल्या हल्ल्यातील फरार दोन आरोपींना अटक करण्यात यश आले असून त्यांची नावे शोएब अजीम शेख रा.गांधीनगर,एजाज निसार शेख,रा.वैष्णोदेवी मंदिराजवळ गांधीनगर ही असून यांना काल रात्री पाळत ठेऊन चौकशी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिपक रोठे यांनी अटक केली आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान काल रात्री शहर पोलिसांना सदर आरोपींचा ठावठिकाणा समजला होता.त्यानुसार पोलिसांनी आपला डाव खेळून शोएब अजीम शेख व एजाज निसार शेख,दोघे रा.गांधीनगर यांना बेड्या ठोकल्या आहेत.या प्रकरणी तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिपक रोठे यांनी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी भूमिका बजावली आहे.
कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण अडीच कि.मी.असलेल्या नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीजवळ दिनाक २४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्यां सुमारास घडली होती.तेथे कोपरगाव नगरपरिषदेचे डांबरीकरणाचे काम ठेकेदार योगेश मोरे यांनी घेतले होते.येथे काम सुरू असताना आरोपीना संबधित ठेकेदार यांनी हरकत घेऊन “सदरचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे,तुम्ही दुसरीकडून जा” असे सांगितल्याचा राग येवून त्यांनी ठेकेदार योगेश मोरे आणि त्यांचे बंधू ,पुतण्या आदींना गज,लाकडी दांडे,दगड आदींच्या सहाय्याने शिवीगाळ करत जोरदार हल्ला चढवला होता.घटनास्थळी नजीकच्या नागरिकांनी धाव घेऊन सदरचे भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला असता तो फोल ठरला होता.दरम्यान या घटनेत फिर्यादी योगेश मोरे सह त्यांचे बंधू गणेश मोरे,पुतण्या पवन मोरे आदी तीन जण गंभीर जखमी झाले होते.या घटनेत सत्ताधारी गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा आढाव हे मध्यस्थी करताना गंभीर जखमी झाले होते.
या प्रकरणी आरोपी अजीम करीम शेख,अमजद जहाबाद पठाण,मजीद रशीद पठाण व अन्य चार ते पाच जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक-५५९/२०२४भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम ११८(१),(२)११५(२),३५२,१८९(२),१९१(२),(३)१९०,सह फौजदारी दुरुस्ती कायदा कमल ७ प्रमाणे आठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.यातील दोन आरोपी अजीम करीम शेख,अमजद जहाबाद पठाण यांना पोलिसांनी घटनेनंतर अटक करून शहर पोलीस अधिकारी यांनी कोपरगाव अतिरिक्त मुख्य न्या.भगवान पंडित यांचेसमोर हजर केले होते.त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती तर अन्य आरोपींचा पोलिस शोध घेत होते.
दरम्यान काल रात्री शहर पोलिसांना सदर आरोपींचा ठावठिकाणा समजला होता.त्यानुसार पोलिसांनी आपला डाव खेळून शोएब अजीम शेख रा.गांधीनगर,एजाज निसार शेख,रा.वैष्णोदेवी मंदिराजवळ गांधीनगर यांना बेड्या ठोकल्या आहेत.या प्रकरणी तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिपक रोठे यांनी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी भूमिका बजावली आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्या.भगवान पंडित यांचसमोर काल हजर केले होते.त्यावेळी याबाबत सरकारी अभियोक्ता प्रदीप रणधीर यांनी सरकारी पक्षाचे वतीने जोरदार बाजू मांडली होती.तर आरोपींच्या वतीने ऍड.एम.एम.सय्यद यांनी बाजू मांडली होती.त्यांना आज पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर केले असता आज दुपारी न्यायालयाने न्यायिक कोठडी मंजूर केली असल्याची माहिती चौकशी अधिकारी दिपक रोठे यांनी दिली आहे.