जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात दरोडा,दोन ठार एक जखमी

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव तालुक्यातील दक्षिणेस साधारण ३० कि.मी.अंतरावर असलेल्या काकडी (शिर्डी) विमानतळाला लागून दक्षिण बाजूस असलेल्या (मूळ संवत्सर येथील रहिवासी असलेल्या) भोसले वस्तीवर रात्री अज्ञात इसमांनी कुऱ्हाडीने (!) केलेल्या हल्ल्यात मुलगा कृष्णा साहेबराव भोसले (वय ३२) हे जागीच त्यांचे वडील साहेबराव पोपट भोसले (वय ६०) हे दोघे ठार झाले आहे तर साखरबाई साहेबराव भोसले (वय-५५)(आई) ही गंभीर जखमी झाली आहे तर-त्यांची सासू गजुबाई मारुती दिघे (वय ७०) या मात्र या हाणामारी पासून संशयास्पदरित्या बचावल्या आहेत.दरम्यान ही घटना जाणीवपूर्वक केलेला खून आहे की दरोडा याचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला आणि त्यांचे सहकारी घेत असताना पोलिसांनी आज दुपारी दोन आरोपींना सिन्नर येथील रस्त्यावर मुद्देमालासह अटक केली आहे. या घटनेने नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

  

मयत मुलगा कृष्णा साहेबराव भोसले यांचे छायाचित्र.

   दरम्यान यातील दोन आरोपी मोखाडा येथील असल्याचे समजले असून हे आरोपी तीन महिन्यांपूर्वी मका कुट्टी करण्यासाठी मजूर म्हणून काकडी आणि परिसरात आले होते.त्यातून त्यांनी तीन दिवस वस्तीची टेहळणी करून आज पहाटेच्या सुमारास जवळ असलेल्या फावड्याने ही हत्या केली असल्याचे माहिती हाती आली आहे.त्यांना अजून आणखी आरोपींची साथ असावी आसा पोलिसांचा कयास आहे.त्यातून पुढे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

 

बापलेकांची हत्या झालेली काकडी हद्दीतील ही वस्ती छायाचित्रात दिसत आहे.

 

दरम्यान मयत तरुण कृष्णा भोसले हा अद्याप अविवाहित असून त्याच्या लग्नाची तयारी घरात सुरू होती.स्थळपाहणीसाठी पाहुणे येत होते.त्याचे व वडिलांचे घर बांधून लग्न करण्याचा विचार होता.मात्र त्या आधीच काळाने या बापलेकावर उडी घेऊन त्यांचे स्वप्न चक्काचूर केले आहे,त्यांच्या घरात  कुदिपकच नाहीसा झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

   कोपरगाव तालुक्यातील गुन्हेगारीचा आलेख सारखा वाढत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने वारंवार अधोरेखित केले आहे.मात्र पोलिस यावर काहीही कारवाई करत असताना दिसत नाही परिणामी गुन्हेगारांचे फावत असल्याचे वारंवार उघड होत आहे.गावठी कट्टे तर भाजीपाला मिळावा असे मिळत असून त्यात वाळू चोरांचा मोठा वाटा असल्याचे दिसून येत आहे.यात महसूल आणि पोलिसांत घुसलेला भ्रष्टाचार याने व्यवस्था पुरती पोखरून काढली असल्याचे दिसत आहे.त्यामुळे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे दिसून येत आहे.त्याचे रूपांतर आता टोळी युद्धसदृश स्थितीत होताना दिसत आहे.अशीच घटना रात्रीच्या सुमारास काकडी विमानतळाच्या दक्षिणेस हाकेच्या अंतरावर घडली आहे.मात्र ही घटना सकाळी दिघे वस्तीवर रोज दूध काढण्यासाठी होणारी कोणतीही हालचाल दिसली नाही.शिवाय सकाळी दूध घालण्यासाठी गावात जाण्यासाठी कोणीही घराबाहेर पडले नाही म्हणून शेजारी वस्तीवाल्या शेजाऱ्यांना संशय आला त्यावरून या घटनेचा भांडाफोड झाला आहे.

घटनास्थळी दाखल झालेला राहाता पोलिस ठाण्याचा फौजफाटा दिसत आहे.

  

दरम्यान याबाबत या आरोपींनी दारूच्या नशेत असताना चोरून नेलेला मोबाईल सुरू केल्याने पोलिसांना आरोपींचा ठावठिकाणा समजण्यास मदत झाली आहे.पोलिसांनी मोखाडा येथील आरोपी मुद्दमाल घेऊन जाताना सिन्नरच्या पुढे रस्त्यावरच अटक केली आहे.

 

मयत साहेबराव भोसले यांचे छायाचित्र.

 

दरम्यान आमच्या प्रतिनिधीस प्राप्त माहितीनुसार सदर मयत साहेबराव भोसले आणि त्यांचे सुपुत्र कृष्णा भोसले यांचे आरोपी नगर पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे ट्रॅप केले असून त्यांना अटक करून लोणी पोलिस ठाण्यात दाखल केले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे या घटनेला वेगळे वळण मिळाले असून आरोपींनी ही घटना का घडवली याचा खुलासा आज सायंकाळपर्यंत पोलिसांकडून होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

   दरम्यान त्या ठिकाणी असलेल्या काही कर्तव्यदक्ष असलेल्या नागरिकांनी ही बाब राहाता पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांचे दूरध्वनी वरून लक्षात आणून दिली होती.त्यावेळी सावध झालेल्या शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमणे यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली होती.त्यावेळी घटनास्थळी मुलगा कृष्णा साहेबराव भोसले (वय ३२) हे जागीच ठार झाले असल्याचे दिसून आले आहे,तर त्यांचे वडील साहेबराव पोपट भोसले (वय ६०) हे गंभीर जखमी झाले असल्याचे दिसून आले होते.त्यांना तातडीने उपचारार्थ शिर्डी येथील रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित  केले आहे.तर साखरबाई साहेबराव भोसले (वय-५५)(आई) ही गंभीर जखमी झाली आहे त्या अद्याप कोमात असल्याची माहिती मिळाली आहे.तर त्यांची सासू गजुबाई मारुती दिघे (वय-७०) या मात्र या हाणामारी पासून संशयास्पदरित्या बचावल्या आहेत.

    दरम्यान ही घटना जाणीवपूर्वक केलेला खून आहे की दरोडा याचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला आणि त्यांचे सहकारी घेत असून घटनास्थळी श्वानपथक घेत आहे.या घटनेने नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.घटनास्थळाची पोलिसांनी नाकेबंदी केली असून वस्तीला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

गंभीर जखमी साखरबाई साहेबराव भोसले यांचे छायाचित्र.

  

एका माहितीनुसार सदर चोरटे सलग तीन दिवस रात्रीबेरात्री या काकडी येथील भोसले वस्तीवर पाणी पिण्याच्या निमित्ताने येत असल्याची माहिती मिळत आहे.मात्र सदर अटक दोन आरोपी तेच आहे का याची पोलिस लोणी येथे खातरजमा करत आहे.

  दरम्यान यातील एका माहिती नुसार सदर ठिकाणी हे कुटुंब संवत्सर येथून आले त्याला कारण तेथील दिघे कुटुंबातील मयतांची सासू गजुबाई दिघे यांना तीन मुले होती.त्यातील एका मुलाचे आकस्मित निधन झाले होते.त्यानंतर अल्पावधीत त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते.या आपत्यास एक मुलगी होती.मात्र तिला हिस्सा द्यायला नको म्हणून उर्वरित दोन भावांनी सदर जमिनीपैकी सहा एकर जमीन ही संवत्सर येथील आपल्या मुलीस म्हणजेच जखमी साखरबाई साहेबराव भोसले यांच्या नावावर अल्प काळासाठी परत भावांच्या नावावर करून देण्याच्या बोलीने दिली होती.मात्र पुढे जाऊन सदर जमीन भोसले कुटुंब म्हणजेच साखरबाई भोसले आपल्या दोन भावांच्या म्हणजेच दिघे बंधूंच्या नावावर करून देत नव्हती.त्यातून वाद उद्भवले होते.त्यातून त्यांची वारंवार भांडणे होत होती.त्यामुळे ही हत्या त्यांनी घडवून आणली असावी शक्यता व्यक्त होत आहे.मात्र ती शक्यता फार कमी असल्याचे तर दुसऱ्या माहितीनुसार यातील मयत इसम साहेबराव भोसले यांचे संवत्सर येथे असताना एक गंभीर गुन्हा दाखल झालेला होता.त्यातून त्यांना कारागृहाची वारी घडली होती मग त्या जुन्या गुन्ह्यातून हे हत्याकांड घडले का ? याबाबत काकडी आणि परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.तर तिसऱ्या शक्यतेनुसार हा गुन्हा चोरट्यांनी चोरी करण्याच्या इराद्याने गुन्हा केला असल्याची शक्यता असून आपले नाव उघड होऊ नये यासाठी ही हत्या केली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मात्र वृध्द महिला अंध असल्याने तिला त्यांनी सोडून दिले असावे असे दिसते.यातील तिसरी शक्यता दिसत असल्याची माहिती होती.

   दरम्यान उशिरा मिळालेल्या माहितीनुसार राहाता पोलिसांनी घटनास्थळी जावून तेथील लोकेशन वरून झालेले फोनची माहिती घेऊन व आरोपींनी पळवलेल्या दुचाकीवरून आरोपींचा शोध घेतला असून त्यांच्या सिन्नर तालुक्यातून दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या असल्याचे समजत आहे.त्यांना सिन्नर वरून लोणी पोलिस ठाण्यात आणले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यांची नावे अद्याप जाहीर केले नाही.

  दरम्यान याबाबत या आरोपींनी दारूच्या नशेत असताना चोरून नेलेला मोबाईल सुरू केल्याने पोलिसांना आरोपींचा ठावठिकाणा समजण्यास मदत झाली आहे.पोलिसांनी मोखाडा येथील आरोपी मुद्दमाल घेऊन जाताना सिन्नरच्या पुढे रस्त्यावरच अटक केली आहे.त्यांच्या हातात कोपरगाव येथील सरफाची एक पिशवी असल्याची माहिती हाती आली असून त्यात ते दागिने घेऊन ते पसार झाली होते.दागिन्यांसह मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.व त्यातील आरोपींची ओळख परेड लोणी येथे संपन्न झाली आहे.आरोपींना गावकऱ्यांनी ओळखले आहे.

  दरम्यान सदर मृतदेह पोलिसांनी शव विच्छेदनसाठी पाठविले असल्याची माहिती हाती आली आहे.आज रात्री उशिरा त्यावर अंत्यसंस्कार करण्यात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.मात्र अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.पूर्ण चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई सुरू होईल असे समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close