गुन्हे विषयक
गोहत्येत सापडणाऱ्यांवर मोक्का,कोपरगावात स्वागत

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात गोवंश हत्या आणि गायींच्या तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली असून यात वारंवार गोहत्येच्या गुन्ह्यात सापडणाऱ्या आरोपींवर मकोका कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाणार असल्याच्या घटनेचे कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांचेसह हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार स्वागत केले आहे.

“कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणावर गोवाश हत्या होऊन त्या रक्ताचे पाट थेट पवित्र समजल्या जाणाऱ्या दक्षिण गंगा म्हणून समजल्या जाणाऱ्या गोदावरी नदीत जात असल्याने त्याबाबत श्री सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी कडक शब्दात इशारा दिला होता या पार्श्वभूमीवर हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेला निर्णय योग्य ठरणार आहे”-विजय वहाडणे,माजी शहराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीत संजयनगर परिसरात वारंवार अवैध कत्तलखाणे सुरु असल्याचे सिद्ध होत असून त्या ठिकाणी राजरोस गोवंश कत्तल होत असल्याचे दिसून येत आहे.सात वर्षांपूर्वी ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गोवंश कत्तल झाल्याचे निष्पन्न झाले होते.ते रक्त मिश्रित पाणी पवित्र गोदावरी नदीत जात असून त्याच पाण्याने हिंदू देवदेवतांचा अभिषेक होत आहे.या व अशा अनेक अत्यंत निंदनीय घटना वारंवार उघड झाल्या आहेत.या बाबत शहरातील हिंदू संघटनांनी दोन तीन वर्षापूर्वी कोपरगाव नगरपरिषदेवर व शहरातील तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला होता.त्यात नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांनी जबाबदारीचे खापर एकमेकावर फोडले होते.त्याचे पडसाद उमटले असून कोपरगाव नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी यांनी नुकतीच या समाजाच्या शिष्टमंडळाची नरपालिकेत बैठक घेऊन त्यांना याबाबत कडक समज दिली होती.त्या नंतर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आपल्या काळात त्यांना स्वतंत्र व्यवस्था करून देऊनही ही गोवश कत्तल थांबली नव्हती हे विशेष ! त्यानंत त्यांनीही या गोवंश हत्येबाबत कडक इशारा दिला होता.त्यावर पुन्हा अशा घटना वारंवार घडल्या आहेत.एकदा शिवरात्रीच्या दिवशी नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून संजयनगर येथे मोठा गोमांस व गोवंश जप्त केले होते.त्यामुळे राज्यभर खळबळ उडाली होती.

सदर गोमांस संगमनेर मार्गे थेट गुजरात पर्यंत जात असल्याचं समजलं होते.त्या रक्ताचे पाट थेट पवित्र समजल्या जाणाऱ्या दक्षिण गंगा म्हणून समजल्या जाणाऱ्या गोदावरी नदीत जात असल्याने त्याबाबत श्री सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी कडक शब्दात इशारा दिला होता.तरीही गोवंश हत्या थांबली असे म्हणणे धाडसाचे ठरेल.अशा घटना मधून मधून घडत असल्याचे दिसून येत असल्याने शहरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे.त्यामुळे राज्य सरकारने याबाबत काय तो एकदा निर्णय घेणे गरजेचे होते.त्यातच नगर आणि संगमनेर,श्रीगोंदा आदी ठिकाणही कोपरगाव ची पुनरावृत्ती होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ.संग्राम जगताप यांनी विधानसभेत श्रीगोंदा येथील कायदा सुव्यवस्थेबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.गो तस्करीचे प्रमाण वाढत चालल्याने हे प्रकार रोखण्यासाठी वेगळा कायदा करण्यात यावा,अशी मागणी जगताप यांनी केली होती.या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गो हत्येचा वारंवार गुन्हा करणाऱ्यांवर मोक्काची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.त्यामुळे कोपरगाव येथील नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांचेसह शहर आणि तालुक्यातील हिंदू बांधवांनी त्या घोषणांचे जोरदार स्वागत केले आहे.