गुन्हे विषयक
आकडा काढला,अभियंत्यांस केली मारहाण,गुन्हा दाखल

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वर्तमानात महावितरण विभागासह सर्वच शासकीय विभागाची वसुली मोहीम जोरात सुरू असून त्यासाठी ते ‘फिटे अंधाराचे जाळे….” म्हणत साग्रसंगीत वसुली करत आहे.याच दरम्यान संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत आज सकाळी ०९ वाजेच्या सुमारास वसुलीसाठी अधिकारी गेले असताना त्यांना त्या ठिकाणी विजचोरीचा आकडा दिसून आल्याने त्यांनी तो काढण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी असलेला विजचोर आरोपी गणपत रामदास गायकवाड याने अभियंता दिनेश विक्रम सुरवसे (वय -३०) यांचेसह मयूर प्रभाकर गोरे आदींना मारहाण करून जखमी केले असल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

महावितरण अधिकाऱ्यांना सद्यस्थितीमध्ये मात्र वीजपुरवठ्याची कामे करतानाच वसुलीचा मार्च महिना सुरू असल्याने थकीत बिलाच्या वसुलीसाठी ग्राहकांची वीज सेवा खंडित करावी लागत आहे.वर्तमानात वीज चोरी आणि बिलांवरून महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ले वाढलेले आहे अशीच घटना संवत्सर हद्दीत आज सकाळी ०९ वाजता घडली आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.
‘महावितरण’कडून सध्या वीजबिलाची वसुली सुरू असून त्यांना निरंतन वीजसेवा देणे आणि पुरवठा योग्य पद्धतीने सुरू राहील,यासाठी प्रयत्न करणे हे ‘महावितरण’कंपनीचे काम आहे.ग्राहकांनी बिलाचे पैसे वेळेत भरले तर आम्ही ग्राहकांना वीज वितरण व्यवस्था चांगली ठेवण्यासाठी कंपनीस काम करता येते.सद्यस्थितीमध्ये मात्र वीजपुरवठ्याची कामे करतानाच वसुलीचा मार्च महिना सुरू असल्याने थकीत बिलाच्या वसुलीसाठी ग्राहकांची वीज सेवा खंडित करावी लागत असल्याचे महावितरण अधिकाऱ्यांचा दावा आहे.वर्तमानात वीज चोरी आणि बिलांवरून महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ले वाढलेले आहेत.नाशिक विभागासह अन्य भागांतही असे प्रकार घडले आहेत.महावितरण कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांशी असभ्य वर्तवणूक झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश आहेत.अधिकारी या मोहिमेत आम्ही ग्राहकांच्या घरी जाऊन,त्यांना थकीत बिलाची आठवण करून देत आहोत.या मोहिमेतून नियमित वीज बिल भरणाऱ्यांची संख्याही वाढविणे हा हेतू आहे.जे ग्राहक वीज बिल भरणार नाही, त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करत आहे.मात्र त्यातून काही ठिकाणी त्यातून वाद उद्भवत आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत लक्ष्मीनगर या ठिकाणी आज सकाळी ०९ वाजता घडली आहे.
यातील कनिष्ठ अभियंता दिनेश सुरवसे हे आपले सहकारी मयूर गोरे यांना घेऊन आपली ग्राहकांकडे थकबाकी असलेले वसुली करत असताना त्यांना संवत्सर शिवारात लक्ष्मीनगर येथील रहिवासी ग्राहक गणपत गायकवाड याचे घरी आकडा टाकून अनधिकृत वीज चोरी होत असल्याची बाब लक्षात आल्याने त्यांनी त्यास हरकत घेऊन विचारपूस केली असता आरोपी गणपत गायकवाड यास त्याचा राग येऊन त्याने फिर्यादी अभियंता दिनेश सुरवसे यांचेसह त्यांचा सहकारी मयूर गोरे यांना वाईट-साईट शिवीगाळ करत धक्काबुक्की करत मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.त्याबाबत ते चलचित्रण करत असताना त्यास त्याने हरकत घेतली होती.त्यातून हा वाद उद्भवला आहे.यातील मारहाणीत जखमी झालेले महावितरणचे फिर्यादी अभियंता दिनेश सुरवसे व त्यांचे सहकारी मयूर गोरे हे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-१४५/२०२४भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम १३२,११५,(२),३५२,३५१(२) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे,पोलीस हे.कॉ.जालिंदर तमनर आदींनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.तमनर हे करीत आहेत.