गुन्हे विषयक
पोहेगाव दरोड्यातील आरोपी…या शहरातील,गुन्हा दाखल
न्युजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव ग्रामपंचायत हद्दीत व्यापारी संकुलात असलेल्या ज्ञानेश्वर माधवराव माळवे (वय -५५) यांच्या सुवर्णकाराच्या दुकानावर काल सायंकाळी ५.४५ वाजता अज्ञात चार दरोडेखोरांनी हातात नंग्या तलवारी घेऊन दुकान लुटून जात असताना नागरिकांनी त्यांना रंगेहाथ पकडले असून त्यांचे नावे निष्पन्न झाली असून दोघे सुभाषनगर कोपरगाव येथील रहिवासी असल्याचे माहिती शिर्डी पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान या आरोपीत आदित्य नवनाथ बागुल व दुसरा फराज एजाज सय्यद आदींचा समावेश आहे.तर दोन जण आद्याप फरार असल्याची माहिती आहे.दरम्यान नागरिकांच्या ताब्यात सापडल्याने नागरिकांनी त्यांची येथेच्छ धुलाई केल्याने त्यांना चांगलीच दुखापत झाली असल्याचे समजत आहे.
यातील सविस्तर वृत असे की,यातील जखमी सुवर्णकार ज्ञानेश्वर माळवे यांची सुवर्ण पेढी पोहेगाव ग्रामपंचायत हद्दीतील व्यापारी संकुलात सुरू आहे.दरम्यान तेथील वाढता व्यवसाय पाहून चोरट्यांनी त्यांचेवर वक्रदृष्टी झाली होती.त्यांनी त्यांचेवर पाळत ठेवून काल सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास हातात नंग्या तलवारी, कत्ती,एअर गण घेऊन दुकानात प्रवेश केला होता व दुकानदार ज्ञानेश्वर माळवे व त्यांचा मुलगा यांना धमकावले होते.दुकानातील सर्व होते नव्हते गोळा करून पोबारा करण्याच्या तयारीत असताना त्यांनी बाहेर मोठी गर्दी पाहून स्वतःच्या बचावार्थ त्यांनी सुवर्णकार माळवे यांना समोर करून त्यांची ढाल बनवून पळण्याचा प्रयत्न केला मात्र दुकानदाराचा मुलगा संकेत माळवे याने जोराचा प्रतिकार केला शिवाय समोर उपस्थित ग्रामस्थांच्या ही गंभीर बाब लक्षात आल्याने त्यांनीही दगडांचा मारा करून त्यांना जेरीस आणल्याने त्यांचा बेत पूर्णपणे फसला आहे.परिणामी ते समूहाच्या तावडीत सापडल्याने त्यांना जनतेने चांगलेच चोपवले आहे.त्यात दोघे आरोपी हे गंभीर जखमी झाले आहे.
दरम्यान सदर बाब सुजाण नागरिकांनी शिर्डी पोलिसांना कळवली होती.त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू केले आहे.मात्र त्यात त्यांची मोडतोड झाली का याची सविस्तर माहिती अद्याप हाती आली नाही.यातील दोन आरोपी फरार असून ते चौकशीत निष्पन्न होणार असून त्यानंतर येथील प्रमुख आरोपी सिद्ध होणार आहे व सदरचा धक्कादायक कट कोणी रचला हे सिद्ध होणार आहे.आरोपी यांचा जबाब अद्याप बाकी आहे.दरम्यान यातील चौकशी अधिकारी भारत बलैय्या यांचे म्हणण्यानुसार आरोपी हे तीन होते व एक फरार आहे.
दरम्यान या प्रकरणी आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास शिर्डी पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.३२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०९,३०९,(६)१२५,(ए)३२४(४),(५), आर्म ॲक्ट ३(५),४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भारत बलैय्या हे करीत आहेत.