गुन्हे विषयक
माजी नगरसेवकाचा आत्महत्येचा प्रयत्न ?

न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व कार्यकर्ते यांनी काल सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास नगर मनमाड मार्गावरील येवल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आपल्या चारचाकी वाहानाच्या काचा बंद करून विषारी औषध घेऊन आपली जीवन यात्रा संपविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

योगायोग
दरम्यान ज्या वेळी सदर औषध प्राशन केलेल्या माजी नगरसेवक यास भरती करण्यास रुग्णवाहिकेतून कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यास आणले होते त्याच वेळी विद्यमान लोकप्रतिनिधी हे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन परत निघाले होते.मात्र त्यांना या घटनेची कोणतीही खबर नव्हती त्यामुळे त्यांचा प्रवेश आणि यांचे प्रयाण असा दुर्दैवी योगायोग जुळून आला असल्याची नागरिकांत चर्चा सुरू आहे.
माजी नगरसेवक यांनी काल आ.आशुतोष काळे यांचा,’जनता दरबार’ सुरू असतानाच प्रारंभी त्यास भेट दिली व त्या ठिकाणाहून दुपारी २.१५ वाजता काढता पाय घेतला होता.त्यानंतर ते आपल्या घरी गेले होते.त्यांच्यात आणि कोणात काय मतभेद आहेत ही बाब समोर आली नाही.मात्र त्यानंतर संतप्त होत त्यांनी घरातून आपली चार चाकी काढून त्यांनी थेट येवला रोड नजीक असलेले.त्यानंतर त्यांनी आपल्या घरगुती कारणातून काल सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास आपल्या गाडीत बसून त्यांनी आपली गाडी काचा बंद करून उभी केली होती व सोबत विचार करून आणलेले विषारी औषधाची बाटली काढून थेट मागचा पुढचा विचार न करता ते प्राशन केले होते अशी माहिती हाती आली आहे.
दरम्यान घरी वादंग झाले असल्याने (चर्चा ) सदर माजी नगरसेवक कुठे गेले याची शोधाशोध सुरू झाली होती मात्र ते मिळून येत नव्हते त्यामुळे त्यांचे नेहमी थांबण्याचे ठिकाण कोणते आहे याचा नेमकी जाणीव असलेल्या कार्यकर्त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली होती.त्यावेळी मात्र एका तरुणाने सदर गाडी ओळखली असल्याचे त्याने गाडीजवळ धाव घेतली होती.मात्र तो पर्यंत बराच वेळ निघून गेला होता.त्यांनी जवळच्या नागरिकांची मदत घेत त्यांना डॉ.मूळे येथे वैद्यकीय उपचारार्थ भरती केले होते.मात्र संबधित रुग्णाची परिस्थिती हाताबाहेर असल्याने त्यांनी त्यांना उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी नाशिक येथे संदर्भांकित केले असल्याची माहिती आहे. त्यांना उशिरा नाशिक येथे रात्री ०९ वजेच्या सुमारास भरती केले आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना आगामी ७२ तास धोक्याचे असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.या घटनेने शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.