गुन्हे विषयक
अवैध गोवंश वाहतूक,तिघांवर गुन्हा दाखल
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत समृध्दी महामार्गावर पोल क्रं.५२१.८ जवळ टाटा ४०७ टेम्पो मधून दाटीवाटीने गोवंश जातीचे ०१.२० लाख किमतीचे ०८ बैल,२.५० लाख रुपये किमतीचा टाटा ४०७ टेंपो,असा ०३.७० लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला असून छ.संभाजीनगर येथील आरोपी चालक आनंद विष्णू मोकळे,(वय-२९), बोरवाडी संभाजीनगर येथील गोरक्षनाथ शेषराव पठाडे,(वय -४२),शहा अशकअली बिस्मिल्ला (वय -३९)आदी विरुध्द गुन्हा दाखल केला असून आरोपी मात्र फरार आहेत.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”महाराष्ट्रात नऊ वर्षा पूर्वी भाजप सरकारने गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्यात आला होता.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या कायद्यावर स्वाक्षरी केली होती.तोपासून ‘गोहत्या’ हा दंडनीय अपराध मानला जात आहे.राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असतानाही त्याला पायदळी तूडविण्याचे काम राजरोस सुरू असल्याच्या घटना वारंवार उघड होत आहे.अशीच घटना आज सकाळी ७.५७ वाजता उघड झाली आहे.यातील तीन आरोपी यांनी हे आपल्या वरील वर्णनाच्या टेंपोतून सदर टेंपोला कुठलीही गादी न वापरता,फलक न लावता,प्राणी वाहतुकीचा कुठलाही फलक न लावता गोवंश जातीचे बैल दाटीवाटीने व निर्दयपणे घेऊन जात असताना खबर घाटकोपर मुंबई येथील फिर्यादी इसम आशिष कमलकांत बारीक (वय-२७) यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यास कळवली होती.त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला होता व समृध्दी महामार्गावर सदर वाहन पकडले आहे व आरोपी चालक आनंद विष्णू मोकळे,(वय-२९), बोरवाडी संभाजीनगर येथील गोरक्षनाथ शेषराव पठाडे,(वय -४२),शहा अशकअली बिस्मिल्ला (वय -३९)आदी विरुध्द गुन्हा दाखल केला असून आरोपी मात्र फरार आहेत.सदर घटनास्थळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शेळके यांनी भेट दिली आहे.
दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रं.४९८/२०२४ भारताच्या प्राण्यास निर्दयपणे वागविण्याचे कलम ११(१)(अ)(ड )(ई)(फ)सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९,सह केंद्रीय वाहतूक कायदा कलम १२५(ई) महाराष्ट्र वाहतूक कायदा कलम १३०/१७७ प्रमाणे दाखल केला आहे.घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक शेळके यांचेसह पो.उपनिरीक्षक संजय पवार यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस हे.कॉ.जाधव हे करत आहेत.