जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

खून प्रकरणातील आरोपी अद्याप अटक नाही ?

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव  तालुक्यातील धोत्रे येथील शेतकऱ्यास शिविगाळ केल्या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यासाठी मुलासह निघालेल्या शेतकऱ्याला कारखाली रावसाहेब पुंजाबा गागरे (वय-५५) यांना चिरडून खून केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर या घटनेतील आरोपी अमोल शिंदे हा उपचाराच्या निमित्ताने रात्री फरार झाला आहे.

  

अमोल शिंदे याने गुन्हा दाखल करण्यात जात असणारे मयत रावसाहेब गागरे यांचे अंगावरून दोन-तीन वेळेस कार मागेपुढे करून रावसाहेब गागरे यांचा खून केला होता.यात प्रवीण व प्रशांत हे सुद्धा जखमी झाले.दरम्यान सदर घटनेनंतर अमोल शिंदे पळून गेला होता.तो अद्याप बेपत्ता आहे.

   सदरचे सविस्तर वृत्त असे की,”गुरूवार दि .17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारातून शेतीचे कामे आटोपून रावसाहेब गागरे,त्यांचा मुलगा प्रवीण व प्रशांत गागरे हे ट्रॅक्टरमधून घरी जात होते.त्यावेळी रस्त्यात आरोपी अमोल बळीराम शिंदे (रा.धोत्रे,तालुका कोपरगाव) हा त्याच्या मित्रांसोबत रस्त्यावर दारू पीत बसला होता.त्यावेळी त्यांना प्रवीण गागरे म्हणाला की,”आमचा ट्रॅक्टर जाऊ द्या” त्याचा राग अमोल शिंदे याला आला होता.दरम्यान गागरे पिता-पूत्र तेथून निघून घरी गेले होते.त्यानंतर अमोल शिंदे याने रावसाहेब गागरे यांना फोन करून शिवीगाळ केली होती.

मयत रावसाहेब गागरे

   दरम्यान शिवीगाळ केल्यानंतर अमोल शिंदे विरूद्ध पोलिसांत तक्रार करण्यासाठी रावसाहेब गागरे व प्रवीण आणि त्याचा भाऊ प्रशांत गाग्रे हे रात्री आठच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून कोपरगावकडे निघाले होते.तेव्हा धोत्रे ते खोपडी रस्त्यावर अमोल बळीराम शिंदे याने त्यांच्यावर पाळत ठेवून आपल्या कारने (एम.एच.१७ सी.एच.९९१९) गागरे यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली होती.धडकेमुळे तिघेही खाली पडले.तेव्हा अमोल शिंदे याने रावसाहेब गागरे यांचे अंगावरून दोन-तीन वेळेस कार मागेपुढे करून रावसाहेब गागरे यांचा खून केला होता.यात प्रवीण व प्रशांत हे सुद्धा जखमी झाले.दरम्यान सदर घटनेनंतर अमोल शिंदे पळून गेला होता.

   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात प्रवीण रावसाहेब गागरे (वय ३२) यांनी गुन्हा दाखल केला होता.त्यावरून अमोल शिंदे या आरोपी विरूद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१), ३५२, ३५१ (२)(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यामुळे धोत्रे आणि परिसरात खळबळ उडाली होती.

   दरम्यान या प्रकरणातील आरोपी अमोल शिंदे याचा शोध घेण्यासाठी तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली होती,तेव्हा आरोपी अमोल शिंदे हा वैजापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल झाल्याची माहिती त्यांना मिळाली होती.तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी व त्यांचे पोलिस पथक वैजापूरला गेले होते.यावेळी अमोल शिंदे याच्याही डोक्यास मार लागल्याने त्यास पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रूग्णालयामध्ये हलविण्यात आले असल्याची माहिती हाती आली होती.घाटी रूग्णालयात योग्य पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून डिस्चार्ज मिळताच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली होती.मात्र उपचाराच्या बहाण्याने त्याने रात्री धूम ठोकली असून तो परागंदा झाला आहे.त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close